बुधवार, दि. २७ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सदर बझारमध्ये एक घटना घडल्यानंतर येथे जमावबंदी आदेश लागू झाला होता. असे असतानाचा त्याचा भंग करत बेकायदेशीर जमाव जमवत सामाजिक तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले होते.
सातारा : जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर (रा. कराड) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सातारा शहर पोलिसांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, बुधवार, दि. २७ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सदर बझारमध्ये एक घटना घडल्यानंतर येथे जमावबंदी आदेश लागू झाला होता. असे असतानाचा त्याचा भंग करत बेकायदेशीर जमाव जमवत सामाजिक तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले होते. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार चेतन ठेपणे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मोरे तपास करत आहेत.