maharashtra

भाजपची सातारा पालिकेसाठी बांधणी सुरू


BJP starts planing for Satara Municipality
सातारा शहरात भाजपच्या 131 बूथ कमिटी आहेत. या कमिटीच्या माध्यमातून नियुक्त वॉर्ड प्रमुखांनी राज्य कार्यकारिणीला राजकीय बांधणीचा अहवाल सादर करावयाचा आहे, अशा स्पष्ट सूचना भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी बैठकीत केल्या.

सातारा : सातारा शहरात भाजपच्या 131 बूथ कमिटी आहेत. या कमिटीच्या माध्यमातून नियुक्त वॉर्ड प्रमुखांनी राज्य कार्यकारिणीला राजकीय बांधणीचा अहवाल सादर करावयाचा आहे, अशा स्पष्ट सूचना भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी बैठकीत केल्या.

सातारा शहरातील आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा शहरातील भारतीय जनता पार्टीने प्रत्येक वार्ड साठी एका प्रभारीची नियुक्ती केली आहे. या प्रभारींनी आपल्या वॉर्डचा पूर्ण अभ्यास करून भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यकारिणीकडे अहवाल सादर करायचा आहे. वॉर्ड प्रभारींची बैठक शासकीय विश्रामगृहात  पार पडली.
या बैठकीत बोलताना शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी सातारा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कामाचा आढावा घेतला. तसेच 2014 पासून आज पर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मतांची टक्केवारीत वाढ झाली असे सांगितले. त्याचप्रमाणे 2016 च्या इलेक्शन मध्ये 31 ठिकाणी उमेदवार उभे केले आणि नऊ ठिकाणी उमेदवार मिळाले नव्हते. परंतु आताची परिस्थिती खूपच चांगली आहे. आपल्याला सर्व प्रभागात सर्व वार्डात सर्व कॅटेगिरीचे उमेदवार मिळतील, अशी खात्री व्यक्त केली. कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवावी अशी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना सांगितली. त्याचप्रमाणे करोनाच्या महामारी मध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी केलेले काम लक्षात घेऊन सर्वसामान्य जनतेची हीच अपेक्षा असल्याचे सांगितले. कार्यकारिणी सदस्य अमित कुलकर्णी व सुवर्णा पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सांगितले की, सातारा शहरात भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रकारचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवले जातात. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित असतात. साताऱ्यातील परिस्थिती खूप चांगली आहे. मा. प्रदेशाध्यक्षांनी पण हे मान्य केले आहे आणि सर्वांनी मिळून काम केले तर आपल्याला अवघड काहीच नाही, फक्त पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करावे तिकीट मिळाले तर निवडून येण्यासाठी प्रयत्न करावेत तिकीट मिळाले नाही तर पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या मागे ठामपणे उभे राहावे. लवकरच या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी च्या कोअर कमिटीची नेमणूक केली जाईल, साताऱ्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाला कळविल्या जातीलच परंतु भारतीय जनता पार्टी, सातारा शहर नगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढेल यावर सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काम करावे.

यावेळी नेते दत्ताजी थोरात, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, मिलिंद काकडे, नगरसेविका सिद्धी पवार, प्राची शहाणे, सातारा ग्रामीण चे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, सातारा शहर चे सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी, वैशाली टंकसाळे,चिटणीस रवी आपटे, नजमा बागवान, आघाड्या मोर्चाचे अध्यक्ष व वॉर्ड प्रभारी उपस्थित होते.