maharashtra

भाजपकडून समाजामध्ये तेढ निर्माण

2024 मधील निवडणुकीत अपयशाची भाजपला भीती; कॉ. उदय नारकर यांचे मत

अलिकडच्या काळात सातारा जिल्ह्यात  समाजविघातक ज्या घटना मुद्दामपणे घडवल्या जात आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात अनेक घटना घडल्या आहेत. या घटना समाजामध्ये काही वितुष्ट आहे म्हणुन घडलेल्या आहेत, असं आमचं काही मत नाही. समाज हा सलोख्याने राहतो, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे भेदभाव नसतात. अशा स्थितीत २0२४ मध्ये येणारी लोकसभेची निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आहे, त्याच्या पाठीमागे असणारा राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आहे, यांच्या असं लक्षात आलं आहे की, आपण जनतेचे प्रश्न सोडवलेले नाहीत. म्हणून जनतेचा पाठींबा आपला विसरत असल्याने येणाऱ्या निवडणूकीत यश मिळण्याची शक्यता दिसत नाही. या पार्श्वभूमीवर समाजामध्ये वितुष्ट निर्माण करुन धार्मिक तेढ निर्माण करणाचा प्रयत्न करुन बहुसंख्याक समाजाची मते मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे मत कॉ. उदय नारकर व्यक्त केले.
पुसेसावळी ता. खटाव येथील 'त्या' घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी जमल्यानंतर नागरिकांनाही उत्स्फूर्तपणे साथ दिली होती. केवळ पुसेसावळी नव्हे तर या पध्दतीच्या जिल्ह्यात २५ घटना घडलेल्या आहेत. सामाजिक सलोखा हा कळीचा प्रश्न आहे. लोकशाही टिकविण्यासाठी राष्ट्रीयता जागर अभियानाच्या माध्यमातुन सामाजिक सलोखा परिषद आयोजित केली आहे. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कॉ. उदय नारकर म्हणाले, अलिकडच्या काळात सातारा जिल्ह्यात  समाजविघातक ज्या घटना मुद्दामपणे घडवल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण साताऱ्यात गेले पाहिजे. लोकशाहीच्या रक्षणार्थ, धर्मनिरपेक्ष मुल्य जी राबविली जात आहेत. त्यांच्या बाजूने आपण उभे आहोत हा संदेश जनमाणसात जाणे हे आज आवश्यक आहे. संविधानाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी व्यक्त करण्यासाठी या परिस्थितीत राज्य समितीची बैठक घेतली. साताऱ्यात धर्मनिरपेक्ष मुल्य जागवणारी लोक आहेत. संविधानावर ज्यांची निष्ठा आहे. अशा सर्वांना एकत्र येवून जी सलोखा परिषद आयोजित केली आहे.
कॉ. उदय नारकर म्हणाले, कोल्हापुर, साताऱ्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण करण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या सोबत असणारी जी संघटना आहे. संभाजी भिडे यांच्या संघटना असतील ते मुद्दामपणे शाहू, फुले विचारांचा परिसर आहे, किंवा  सत्यशोधक चळवळीची परंरपरा आहे, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारची भूमि आहे, भाउराव पाटील यांच्या कार्याची तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षण घेतलेली भुमी आहे. या समतेचा विचार हा उखडून टाकायचा अन येथे हिंदूत्ववादी धर्मांध, मुस्लीम विरोधी, अल्पसंख्याकबद्दलच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करायचा यासाठी पुसेसावळी येथील घडवलेली घटना  ही निंदनीयच आहे.
यावेळी माकपचे किसान सभेचे अध्यक्ष कॉ. डॉ. अशोक ढवळे, जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय चिटणीस मरियम ढवळे, राष्ट्रीय जागर अभियानचे निमंत्रक मिनाज सय्यद, राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई, शिवसेनेचे सचिन मोहिते आदी उपस्थित होते.

विक्रम पावसकर यांच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण झाली
कॉ. उदय नारकर म्हणाले, भाजपचे राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांचा कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील घटना घडवण्यामध्ये पुढाकार आहे. अजूनही याच पध्दतीने त्यांचा प्रयत्न सुरु आहे, त्या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी जातीच्या धर्माच्या नावावर तंटे निर्माण होवू नयेत म्हणून साताऱ्यात सामाजिक सलोखा परिषद आयोजित केली आहे. या परिषदेला आम्ही अंगणवाडीसेविका, शेतकरी, कष्टकरी वर्गातील समुदाय एकत्रीत करत त्यांच्यामाध्यमातून हा संदेश जिल्हाभर पोहोचवत आहोत.