भाजपने समृद्धी महामार्गासाठी कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प रद्द केला
आ. पृथ्वीराज चव्हाण : ट्विटद्वारे भाजपवर साधला निशाना
पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील कराड-चिपळूण हा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा महात्वाकांशी प्रकल्प होता. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला या प्रकल्पाचे भुमिपुजनही केले. तसेच राज्य सरकारने यातील 50 टक्के खर्च उचलण्याचे मान्य केले. परंतु, भाजपने समृद्धी महामार्गासाठी कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प रद्द केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
कराड : पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील कराड-चिपळूण हा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा महात्वाकांशी प्रकल्प होता. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला या प्रकल्पाचे भुमिपुजनही केले. तसेच राज्य सरकारने यातील 50 टक्के खर्च उचलण्याचे मान्य केले. परंतु, भाजपने समृद्धी महामार्गासाठी कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प रद्द केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत नुकतेच ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कराड-चिपळूण रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. त्यासंदर्भात शापूरजी पालनजी कंपनीसोबत करारही करण्यात आला होता. तसेच तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला या प्रकल्पाचे भुमिपुजनही केले होते. शिवाय, राज्य सरकारने या प्रकल्पासाठी लागणाऱ्या खर्चातील 50 टक्के खर्च उचलण्याचे मान्य केले होते. परंतु, भाजपने समृद्धी महामार्गासाठी हा प्रकल्प रद्द केला असल्याचे त्यांनी सदर ट्विटमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारा कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्पासाठी ऑगस्ट 2016 मध्ये करार केला होता. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कराड येथे करण्यात आले होते. स्थानिक आ. बाळासाहेब पाटील व आनंदराव पाटील यांच्यासह अनेक कराडकरांनी प्रत्यक्ष प्रक्षेपण पाहून या कामकाजात भाग घेतला. यानुसार शापुनजी पालनजी या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीकडे या प्रकल्पाचे काम सोपविण्यात आले होते.
कराड-चिपळूण हा रेल्वे मार्ग १०३ कि.मी. लांबीचा असून याचा प्रस्तावित खर्च 3,195.60 कोटी रुपये आहे. या मार्गावर कराडपासून खोडशी, सुपने, विहे, मल्हारपेठ, नाडे, पाटण, येराड, कोयनारोड ही ठिकाणे येणार होते. पुढे सह्याद्री पर्वतरागांच्या बोगद्यांतून हा मार्ग खेर्डी (चिपळूण) येथे कोकण रेल्वे मार्गाला मिळणार होता. या मार्गामुळे कोकण व घाटमाथा रेल्वेने जोडण्यास मदत होणार असून प्रवाशी, व्यापारी किंवा उद्योग व्यावसायिकांना देशाच्या काना-कोपऱ्यातील प्रवासासह मालवाहतूकीसाठीही मोठी मदत होणार होती. परंतु, भाजपने समृद्धी महामार्गासाठी कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प रद्द केला आहे. पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील कराड-चिपळूण हा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा महात्वाकांशी प्रकल्प होता. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला या प्रकल्पाचे भुमिपुजनही केले. तसेच राज्य सरकारने यातील 50 टक्के खर्च उचलण्याचे मान्य केले. परंतु, भाजपने समृद्धी महामार्गासाठी कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प रद्द केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत नुकतेच ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कराड-चिपळूण रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. त्यासंदर्भात शापूरजी पालनजी कंपनीसोबत करारही करण्यात आला होता. तसेच तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला या प्रकल्पाचे भुमिपुजनही केले होते. शिवाय, राज्य सरकारने या प्रकल्पासाठी लागणाऱ्या खर्चातील 50 टक्के खर्च उचलण्याचे मान्य केले होते. परंतु, भाजपने समृद्धी महामार्गासाठी हा प्रकल्प रद्द केला असल्याचे त्यांनी सदर ट्विटमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारा कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्पासाठी ऑगस्ट 2016 मध्ये करार केला होता. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कराड येथे करण्यात आले होते. स्थानिक आ. बाळासाहेब पाटील व आनंदराव पाटील यांच्यासह अनेक कराडकरांनी प्रत्यक्ष प्रक्षेपण पाहून या कामकाजात भाग घेतला. यानुसार शापुनजी पालनजी या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीकडे या प्रकल्पाचे काम सोपविण्यात आले होते.
कराड-चिपळूण हा रेल्वे मार्ग १०३ कि.मी. लांबीचा असून याचा प्रस्तावित खर्च 3,195.60 कोटी रुपये आहे. या मार्गावर कराडपासून खोडशी, सुपने, विहे, मल्हारपेठ, नाडे, पाटण, येराड, कोयनारोड ही ठिकाणे येणार होते. पुढे सह्याद्री पर्वतरागांच्या बोगद्यांतून हा मार्ग खेर्डी (चिपळूण) येथे कोकण रेल्वे मार्गाला मिळणार होता. या मार्गामुळे कोकण व घाटमाथा रेल्वेने जोडण्यास मदत होणार असून प्रवाशी, व्यापारी किंवा उद्योग व्यावसायिकांना देशाच्या काना-कोपऱ्यातील प्रवासासह मालवाहतूकीसाठीही मोठी मदत होणार होती. परंतु, भाजपने समृद्धी महामार्गासाठी कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प रद्द केला आहे.