सातारा जिल्ह्यातील रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यांना वाचा फोडण्यासाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ यांच्या वतीने एक डिसेंबर 2023 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
थकित मानधन, शासकीय सेवेत समायोजन, बदली धोरण यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये पुरुष तसेच महिला आरोग्य कर्मचारी सहभागी झाले आहेत.
निविष्ठा उत्पादन, विक्री व पुरवठा या बाबत सध्याच्या कायद्यांमधील तरतुदी पुरेशा नसल्याचे सांगत राज्य सरकारने नवे कायदे करण्याची प्रक्रिया चालू केली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी पोवाडे, कविता आणि व्याख्यानांनी राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. संपामध्ये 6 हजार 9994 कर्मचारी सहभागी झाले आहेत.
निलंबन रद्द करून प्रलंबित पहिली आश्वासित प्रगती योजना लागू करावी या मागणीसाठी मनोहर कदम यांनी येथील सदरबझार परिसरात असणार्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या बाहेर आंदोलन केले.
सातारा नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळ शाळा क्रमांक एकूण 18 पैकी पंधरा शाळांमध्ये नियुक्त शिक्षक, शिक्षण सहाय्यक व मदतनीस यांचे स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याची मागणी संयुक्त शिक्षण बचाव समितीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. या शिक्षक संघटनेच्या सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली.
सातारा: सातारा शहरातील पोवई नाका परिसरात असलेल्या शासकीय गोदामाचे दुरुस्तीचे काम दोन महिन्यापूर्वी करण्यात आले. पहिल्याच अवकाळी पावसात या इमारतीवरील दुरुस्ती करण्यात आलेले पत्रे उडून गेले. त्यामुळे गोदामातील धान्याचे नुकसान झाले असून अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार व अभियंत्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा जनहितार्थ तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टी पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार सागर भोगावकर यांनी दिला आहे.
करंजे तर्फ सातारा येथील सर्व्हे नंबर २५९/१/२ मधील ९१०० चौ.मी. हे क्षेत्र एनए केले असून ते रद्द करण्यात यावे. हे क्षेत्र एनए करण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी आजाद समाज पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे.
फलटण नगर परिषद परिसरातील मेटकरीगल्ली भागातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त महिलांनी ऐन सणासुदीतच नगरपालिकेसमोरच मोकळे हंडे घेऊन धरणे आंदोलन धरले. ऐन सणासुदीत पाण्यासाठी आंदोलन करावे लागल्याने महिलांनी यावेळी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
कांदाटी खोऱ्यातील गावांमध्ये अभयारण्याचे असलेल्या गट नंबरची मोजणी करून नकाशे तयार करण्यात येणार आहेत. याचप्रमाणे रासाठी, गोकुळ व शिवंदेश यांच्यावर पुनर्वसनाचा शासनाकडे गेलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यानुसार याप्रश्नी प्रधान सचिव पुनर्वसन यांनी २२ रोजी यासंबंधी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्याचे लेखी पत्र दिल्यामुळे २१ मार्च रोजी होणारे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
८ मार्च रोजी सातारा येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असतानाच दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाबाहेर जिल्ह्यातील विविध संघटनांनी आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलनाचा एल्गार पुकारला. या आंदोलनात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. आंदोलनाची तीव्रता पाहून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
खा. राजु शेट्टी यांनी कोल्हापूर येथे सुरू केलेल्या आंदोलनाची दखल राज्यशासन घेत नसल्याने त्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात चक्का जाम आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला.
सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ना. नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
राज्य शासनाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये बदल केल्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विपरीत परिणाम होणार आहे. या निर्णयामुळे विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे राजकीयकरण होणार आहे. त्यामुळे, विद्यार्थी हिताचा विचार करून हा प्रस्तावित विद्यापीठ सुधारणा कायदा तत्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
२०१८ ते २०२१ या कालावधीमध्ये सातारा तालुका वन विभागातील वनरक्षकका पासुन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा केला आहे. त्याबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागवली असता ती अपूर्ण स्वरूपात दिली जात असल्याच्या निषेधार्थ शिवसेना सातारा विधानसभा यांच्यावतीने आज सातारा येथील वनभवन येथे गांधीगिरी आंदोलन करत अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प दिले.
गेल्या तीन महिन्यापासून सर्वसाधारण सभा न झाल्याने सर्वसामान्यांची विकास कामे खोळंबून पडली आहेत. लोकांचे प्रश्न सोडवायचे नाही तर खुर्चीत बसायचे कशाला ? असा सणसणीत सवाल नगर विकास आघाडीने निवेदनाद्वारे विचारला आहे. लवकरात लवकर सर्वसाधारण सभा न निघाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला असून नगरविकास आघाडीने हे निवेदन बुधवारी जिल्हा प्रशासनाला सादर केले.
कराड तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात वारंवार बिबट्याचे हल्ले होत आहेत. येणके येथे नुकतेच बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुरांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे वन अधिकारी एससी ऑफीसमध्ये झोपा काढतात का?
अभिनेत्री कंगणा रानावत हिने भारतीय स्वातंत्र्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ साताऱ्यात शिवसेनेने शनिवारी पोवई नाक्यावर घोषणाबाजी केली. सेनेच्या नियोजित जोडे मारो आंदोलना पूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतल्याने आंदोलकांचा मात्र हिरमोड झाला.
पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ऊसा व्यतिरिक्त पैसे मिळवून देणारे दुसरे पीक नसल्याने यावरच येथील लोकांचे जीवन अवलंबून आहे. गेल्या चार वर्षात साखरेचे दर जवळपास 1 हजार रुपयांनी वाढले. मात्र, ऊस दर 100 रुपयांनीही वाढला नाही. साखरेचे दर वाढल्यावर कारखानदारांनी स्वतःहून त्या पटीत किमान 500 ते 600 रुपये दर द्यायला हवा होता.
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी सातारा आगारात कर्मचार्यांनी बंद पाळला आहे. या आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी जाहीर पाठिंबा दिला असून त्यांच्या या पाठिंब्याने आंदोलकांमध्ये नवचेतना निर्माण झाली आहे.
ऊसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळाला पहिले, या मागणीसाठी आम्ही संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार होतो. परंतु, प्रशासनाने आमची कोंडी करून रोखून धरले. मात्र, आम्ही कराडमध्ये कुठेही बसलो, तरीही सहकारमंत्र्यांच्या दारातच ठिय्या दिल्यासारखा आहे.
उपमुख्यमंत्री यांनी डिंसेबरमध्ये भरतीची घोषणा केली. परंतु दोन वर्षात भरती न झाल्याने वयाची मर्यादा हा विषय आहे, या पार्श्वभूमीवर लष्कराच्या विभागाने वयाच्या बाबतीत लेखी आश्वासन दिले आहे, मात्र त्याबाबत आदेश काढावा.
समीर वानखेडे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो चे प्रादेशिक अधिकारी असुन नियमाप्रमाणे कार्य करत आहेत. पंरतु ड्ग्स प्रकरणात बाँलीवुड चित्रपटातील नामवंत सेलेब्रेटीसची मुले असल्याने या प्रकरणाला मिडिया खूप मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी देत आहे. गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा सापडला असताना त्यावर मात्र चर्चा होताना दिसत नाही.
जावली तालुक्यातील बोंडारवाडी धरणासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, त्यासाठी आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करावे लागले तरी चालेल, मी तुम्हाला तुमच्या हक्काचे धरण मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. यासाठी मला तुमची शेवटपर्यंत साथ हवी, असे आवाहन श्रमिक मुक्तीदलाचे प्रणेते व धरणग्रस्त संघटनेचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी ५४ गावच्या नागरिकांना केले.
साताऱ्यात चार भिंती शिवसेना जिल्हा कार्यकारीणीच्या वतीने कंदिल आंदोलन करण्यात आले. या परिसरात पथदिवे लावून हा परिसर प्रकाशमान करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सातारा येथील हुतात्मा स्मारक परिसरात असलेल्या अग्निशमन दल व घंटागाड्या सातारा नगरपालिकेच्या प्रशासनाने तात्काळ हलविण्यात याव्यात अन्यथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तिरंगा विकास प्रतिष्ठानच्या प्रमुख हर्षदा शेडगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मंगळवार, दि. 15 पासून वडूजचे भाजपचे नगरसेवक अनिल माळी धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.
सांगली जिल्ह्यातील वजनदार नेत्यांनी कायम दुष्काळात होरपळणार्या माणच्या पूर्वेकडील जनतेला डावलून टेंभू योजनेतील पाण्याचा एक थेंबही न देता, सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून पाणी पुन्हा सांगली जिल्ह्यातील दिघंचीकडे वळवले आहे.वरकुटे-मलवडी, शेनवडी गावच्या सीमेवरून टेंभू योजनेचे पाणी जात असताना स्वातंत्र्य पूर्व काळापासून तहानलेली जनता कसलीही तमा न बाळगता, जनआंदोलन उभारून पाणी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारचे मत पाणी संघर्ष चळवळीचे कार्यकर्ते धीरज जगताप यांनी शेनवडी येथे व्यक्त केले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे कुलूपबंद असल्याने भाविकांना आपल्या आराध्य दैवतांचे दर्शन, भजन, पूजन करणे अवघड झाले आहे. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे नियमित उघडण्याच्या मागणीसाठी खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथे ‘भाजपा’तर्फे ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ अशी हाक देत आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात दि. 18 मार्चपासूनच मंदिरे व सर्व धार्मिक पूजा बंद आहेत.
वाठार स्टेशन येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील हनुमान मंदिराच्या तसेच प्रमुख मंदिरांच्या बाहेर घंटा वाजवून घंटानाद व थाळीनाद आंदोलन केले.
म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, रोज वाढणार्या कोरोना रुग्णांना दाखल करण्यासाठी म्हसवडसह जिल्ह्यात कोठेही बेड उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य रुग्णांचे होत असलेले हाल पाहून शहरातील ‘आम्ही म्हसवडकर ग्रुप’च्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 28) एकत्र येत म्हसवड आरोग्य केंद्रासमोर ठिय्या मांडत प्रशासनाच्या विरोधात जोरदार केलेल्या घोषणाबाजीची तत्काळ दखल घेत माणच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी म्हसवड येथे येऊन शहरातील धन्वंतरी रुग्णालय हे ताब्यात घेत आजपासून हे रु
गाईच्या दूधाला दर देण्याच्या मागणीसह दूध उत्पादक शेतकर्यांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. 24 जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबाबत काढलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सातारा येथे भाजपच्या वैद्यकीय आघाडी सातारा जिल्हा, सातारा शहर आणि सातारा ग्रामीण यांच्यातर्फे आंदोलन करण्यात आले. पोवई नाका येथे जोरदार निदर्शने करून अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन पाठवण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनचा मार्ग बंद करून राज्यातील एसटी बस पुन्हा पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी बहुजन वंचित आघाडीच्यावतीने एसटी आगार आवारात हलगी वादन आंदोलन करून प्रशासनास जाग आणण्याचा प्रयत्न केला.
सातारा : देशात आणि राज्यात कोरोनाच्या संकटाने अगदी थैमान घातले असताना त्याला रोखण्यासाठी काही नियोजन नसतानासुध्दा सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्या कालावधीत उपाय योजना करण्यात सरकार पूर्णपणे अपशयी ठरले आहेत. त्यामुळे लोकांचे भूकबळी जाण्यापेक्षा सततचा लॉकडाऊनचा पर्याय रद्द करून शासनाने कोरोना नियंत्रणावर लक्ष द्यावे. तसेच एसटी पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी वंचित आघाडीच्या वतीने डफली आंदोलन करण्यात आले.