खा. राजु शेट्टी यांनी कोल्हापूर येथे सुरू केलेल्या आंदोलनाची दखल राज्यशासन घेत नसल्याने त्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात चक्का जाम आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला.
सातारा : खा. राजु शेट्टी यांनी कोल्हापूर येथे सुरू केलेल्या आंदोलनाची दखल राज्यशासन घेत नसल्याने त्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात चक्का जाम आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला.
याबाबत आंदोलनकर्त्यांनी दिलेली माहिती अशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजु शेट्टी यांनी कोल्हापूर येथे शेतकऱ्यांना दिवसा दहा तास विज मिळावी तसेच वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांवर अनेक बाबतीत होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आंदोलन सुरू करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज राज्यभर चक्का जाम आंदोलन केले.
सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे शेतकरी संघटनेने आज सकाळी ११ वाजता चक्का जाम आंदोलन करत राज्य शासनाचा जाहीर निषेध केला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. तसेच खा. राजु शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. सातारा जिल्ह्यात उंब्रज- चाफळ रोड, दहिवडी, फलटण- जिंती रोड आदी ठिकाणी स्वभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.