समीर वानखेडे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो चे प्रादेशिक अधिकारी असुन नियमाप्रमाणे कार्य करत आहेत. पंरतु ड्ग्स प्रकरणात बाँलीवुड चित्रपटातील नामवंत सेलेब्रेटीसची मुले असल्याने या प्रकरणाला मिडिया खूप मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी देत आहे. गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा सापडला असताना त्यावर मात्र चर्चा होताना दिसत नाही.
सातारा : ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला एन सी.बीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी अटक केल्यापासून व आर्यन खानला अजुनही जामीन मिळाला नसल्यामुळे, रोज समीर वानखेडे यांना टार्गेट करुन त्याना मानसिक त्रास दिला जात आहे. समीर वानखेडे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो चे प्रादेशिक अधिकारी असुन नियमाप्रमाणे कार्य करत आहेत. पंरतु ड्ग्स प्रकरणात बाँलीवुड चित्रपटातील नामवंत सेलेब्रेटीसची मुले असल्याने या प्रकरणाला मिडिया खूप मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी देत आहे. गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा सापडला असताना त्यावर मात्र चर्चा होताना दिसत नाही.
समीर वानखेडे प्रामाणिक अधिकारी असुन मागासवर्गिय आहेत. त्यांनी आपली जबाबदारी पार पाडतांना नामांकित व्यक्तीवर सुध्दाकारवाई केली आहे. त्यामुळे दुखावलेल्या या प्रतिनिधिनी समीर वानखेडे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु केले. महाराष्ट्राचे नामांकीत मंत्री वयक्तीकपणे समीर वानखेडे यांचेवर व परिवारावर खोटे आरोप करुन बदनाम करीत असल्याचे दिसुन येते. या प्रकरणात धर्माच्या नावा वरुन कधी जातीच्या नावावरुन बदनाम करुन समीर वानखेडे यांना मानसिक त्रास देत आहेत.
समीर वानखेडे प.पू.डाँ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत किंवा नाही हामुद्दा नाही. परंतु, ते प्रामाणिक व कर्तबगार अधिकारी असुन मागासवर्गिय असल्यामुळेच त्यांचेवर मानसिक हल्ला केला जात आहे. राज्य सरकारच्या कारभारकर्त्यानी यापूढे समीर वानखेडे यांना मानसिक त्रास देऊन बदनाम केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा ईशारा कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत केला.