सातारा जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचा आंदोलनाचा इशारा
एक डिसेंबर रोजी होणार भव्य धरणे आंदोलन
सातारा जिल्ह्यातील रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यांना वाचा फोडण्यासाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ यांच्या वतीने एक डिसेंबर 2023 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातील रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यांना वाचा फोडण्यासाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ यांच्या वतीने एक डिसेंबर 2023 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेशन दुकानदारांना धान्य वितरणात कराव्या लागणाऱ्या तांत्रिक कसरती, त्यातून मिळणारे तुपपुंजे उत्पादन यामुळे रेशन दुकानदार अडचणीत आले आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी सांगितले.
यासंदर्भातील त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे की सातारा जिल्ह्यामध्ये हजारो रेशन दुकानदार आहेत .सर्वत्र महागाईचा उच्चांक झालेला असताना रेशन दुकानदार मात्र तुटपुंज्या कमिशनवर कुटुंबाची गुजरात करताना मेटाकुटीला आला आहे. रेशन धान्य प्रणाली मध्ये पॉस मशीनची अडचण, सर्व्हर समस्या, पारंपारिक प्रशासकीय तांत्रिक अडचणी यामुळे दुकानदाराला जिने नकोसे झाले आहे. दुकानदारी करताना अनंत अडचणी येत आहेत. यापूर्वी शासनाने केरोसीन व्यवसाय संपुष्टात आणल्यानंतर पंचावन्न हजार कुटुंबे रस्त्यावर आली होती. त्याची कसली दखल शासनाने घेतली नाही. मात्र ही वेळ आता रेशन दुकानदारावरून येऊ नये याकरता हा आंदोलनाचा मार्ग निवडला जात असल्याचे श्रीकांत शेटे यांनी सांगितले आहे.
धरणे आंदोलनानंतर राज्य संघटनेच्या वतीने रेशन दुकानदारांच्या अडचणीची मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांना देण्यात येणार आहे. 1 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता सातारा जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांनी धरणे आंदोलनासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.