सातारा नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळ शाळा क्रमांक एकूण 18 पैकी पंधरा शाळांमध्ये नियुक्त शिक्षक, शिक्षण सहाय्यक व मदतनीस यांचे स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याची मागणी संयुक्त शिक्षण बचाव समितीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. या शिक्षक संघटनेच्या सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली.
सातारा : सातारा नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळ शाळा क्रमांक एकूण 18 पैकी पंधरा शाळांमध्ये नियुक्त शिक्षक, शिक्षण सहाय्यक व मदतनीस यांचे स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याची मागणी संयुक्त शिक्षण बचाव समितीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. या शिक्षक संघटनेच्या सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, सातारा पालिका शिक्षण मंडळाच्या 15 शाळांमध्ये 2013-2014 ते 2019-20 या कालावधीत शिक्षण सहाय्यक, मदतनीस व कर्मचारी यांना नियुक्ती पासून कोविड कालावधीपर्यंत आणि त्यानंतर एप्रिल 2020 नंतर सेवा दिली. नियुक्ती प्रस्तावाची शिक्षण मंडळाकडे वारंवार मागणी करूनही तयार करण्यात आले नाहीत. सर्व शिक्षक, शिक्षण सहाय्यक, मदतनीस शासन निर्देशित वेतन व किमान वेतनापासून वंचित आहेत. उदरनिर्वाह वेतन सुद्धा मिळालेले नाही. आमच्या न्याय मागण्यांसाठी आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हे प्रस्ताव तात्काळ तयार करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर एम.डी. ओहाळ, पूजा मेहरे, तनुजा कांबळे, दिपाली कांबळे, आशा वागळे, नीता काळे, सुषमा मस्के, प्रज्ञा डावकर तसेच शहर सुधार समितीचे असलम तडसरकर, विक्रांत पवार यांच्या स्वाक्षर्या आहेत.