केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनचा मार्ग बंद करून राज्यातील एसटी बस पुन्हा पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी बहुजन वंचित आघाडीच्यावतीने एसटी आगार आवारात हलगी वादन आंदोलन करून प्रशासनास जाग आणण्याचा प्रयत्न केला.
वडूज : केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनचा मार्ग बंद करून राज्यातील एसटी बस पुन्हा पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी बहुजन वंचित आघाडीच्यावतीने एसटी आगार आवारात हलगी वादन आंदोलन करून प्रशासनास जाग आणण्याचा प्रयत्न केला.
या आंदोलनास कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. खटाव-माण संपर्कप्रमुख अजित साठे, तालुकाध्यक्ष सुनील कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक बैले, आनंदा साठे, अमोल जगताप, राहुल पवार, विश्वास जगताप, राजीव चव्हाण, मनोहर नलवडे, वचन जगताप, आकाश खांडेकर, नीलेश खांडेकर, प्रशांत फडतरे, संदीप फडतरे, गणेश खांडेकर आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.