सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ना. नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
सातारा : सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ना. नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
मनी लॉड्रिंग प्रकरणी मंत्री नवाब मलिक चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले होते. ईडी कार्यालयात ८ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.
राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला असतानाच ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी मागील आठवड्यात दक्षिण मुंबईत काही ठिकाणी छापे टाकले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहीम याच्या मालमत्तांशी संबंधित प्रकरणात त्याचा जेलमध्ये असलेला भाऊ इक्बाल कासकर, मृत बहीण हसीना पारकर यांच्या घरांसह अन्य काही ठिकाणी ईडीच्या पथकांनी छापे टाकले होते. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार त्यांची ईडीकडून चौकशी करून त्यांना अटक करण्यात आली होती त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज सातारा येथे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष समिद्रा जाधव, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शफिक शेख, गोरखनाथ नलवडे, विद्यार्थी अध्यक्ष वैभव कळसे, युवती अध्यक्ष पुजा काळे, वाई तालुका अध्यक्ष प्रमोद शिंदे, इतर मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे, सामाजिक सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर कांबळे, कला व सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण शिंदे,भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव, खटाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव, कराड दक्षिण अध्यक्ष संतोष पाटील, जावळी तालुका महिला आघाडी अध्यक्ष रूपालीताई भिसे सेवादलाचे प्रदेश संघटक राजेंद्र लावंघरे, अनिल बडेकर, राजेंद्र सोनवणे, ज्ञानोबा शिंदे,विजय शिंगटे निवृत्ती बाबर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.