लष्कर भरतीत वयोमर्यादेचा अध्यादेश काढावा अन्यथा खळखट्याक आंदोलन
कॉम्रेड जयवंतराव आवळे यांचा इशारा
उपमुख्यमंत्री यांनी डिंसेबरमध्ये भरतीची घोषणा केली. परंतु दोन वर्षात भरती न झाल्याने वयाची मर्यादा हा विषय आहे, या पार्श्वभूमीवर लष्कराच्या विभागाने वयाच्या बाबतीत लेखी आश्वासन दिले आहे, मात्र त्याबाबत आदेश काढावा.
कराड : उपमुख्यमंत्री यांनी डिंसेबरमध्ये भरतीची घोषणा केली. परंतु दोन वर्षात भरती न झाल्याने वयाची मर्यादा हा विषय आहे, या पार्श्वभूमीवर लष्कराच्या विभागाने वयाच्या बाबतीत लेखी आश्वासन दिले आहे, मात्र त्याबाबत आदेश काढावा. अन्यथा दि.11 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय महामार्गावर रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कॉम्रेड्स सोशल अर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉग्रेड जयवंतराव आवळे यांनी दिला आहे.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या दोन वर्षात लष्कराची भरती झालेली नाही. त्यामुळे मुलांच्या वयाची मर्यादा ओलांडून गेल्याने आता भरतीसाठी अपात्र ठरण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सचिव कॉम्रेड प्रा.पै. अमोल साठे, सातारा जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड बासित चौधरी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.