सातारा येथील हुतात्मा स्मारक परिसरात असलेल्या अग्निशमन दल व घंटागाड्या सातारा नगरपालिकेच्या प्रशासनाने तात्काळ हलविण्यात याव्यात अन्यथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तिरंगा विकास प्रतिष्ठानच्या प्रमुख हर्षदा शेडगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
सातारा : सातारा येथील हुतात्मा स्मारक परिसरात असलेल्या अग्निशमन दल व घंटागाड्या सातारा नगरपालिकेच्या प्रशासनाने तात्काळ हलविण्यात याव्यात अन्यथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तिरंगा विकास प्रतिष्ठानच्या प्रमुख हर्षदा शेडगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
हर्षदा शेडगे पुढे म्हणाल्या, हुतात्मा स्मारक हे स्वातंत्र्यपूर्व ज्यांनी आपले बलिदान दिले त्यांच्या स्मरणात करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये अशी २०८ स्मारके आहेत. सातारा येथे असणाऱ्या हुतात्मा स्मारकामध्ये तैनात करण्यात आलेले अग्निशमन दल तत्काळ लावण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी मंत्रालयात बैठक घेऊन दिले होते मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सातारा नगरपालिका प्रशासनाने हुतात्मा स्मारक परिसरात असणारे अग्निशमन दल व घंटागाड्या तात्काळ अन्य ठिकाणी हलव्यात, अन्यथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
सातारा येथे विमानतळ व्हावे असे प्रत्येक नागरिकांचे मत आहे याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी जागा उपलब्ध बाबत पत्र दिले होते मात्र विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ती जागा दुसऱ्या प्रयोजनासाठी वापरली त्याबाबत कोणतीही बैठक न घेतल्याने त्याबाबत नाराजी असल्याचे सांगून हर्षदा शेडगे पुढे म्हणाल्या, छत्रपती शाहू महाराज स्मारक, महाराणी येसूबाई स्मारक व छ. महाराणी सईबाई स्मारक याबाबतही विद्यमान जिल्हाधिकारी कोणतीही कार्यवाही करीत नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.