२०१८ ते २०२१ या कालावधीमध्ये सातारा तालुका वन विभागातील वनरक्षकका पासुन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा केला आहे. त्याबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागवली असता ती अपूर्ण स्वरूपात दिली जात असल्याच्या निषेधार्थ शिवसेना सातारा विधानसभा यांच्यावतीने आज सातारा येथील वनभवन येथे गांधीगिरी आंदोलन करत अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प दिले.
सातारा : २०१८ ते २०२१ या कालावधीमध्ये सातारा तालुका वन विभागातील वनरक्षकका पासुन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा केला आहे. त्याबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागवली असता ती अपूर्ण स्वरूपात दिली जात असल्याच्या निषेधार्थ शिवसेना सातारा विधानसभा यांच्यावतीने आज सातारा येथील वनभवन येथे गांधीगिरी आंदोलन करत अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प दिले.
वनपरिक्षेत्र अधिकारी निवृत्ती चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, २०१८ ते २०२१ या कालावधीमध्ये सातारा तालुका वन विभागातील वनरक्षकका पासुन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा केला आहे. २९ ऑगस्ट २०१९ रोजी याबाबत तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देऊन झालेल्या भ्रष्टाचारा संदर्भात आवश्यक असणारी माहिती माहिती अधिकाराखाली मागितली होती. मात्र संबंधित अधिकारी त्यामध्ये सहभागी असल्यामुळे उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याची बदली झाली. त्या ठिकाणी नवीन अधिकारी आल्यानंतर त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन माहिती देण्यास सुरुवात केली मात्र अपूर्ण स्वरूपात देण्यात आली. एकूणच वरिष्ठ अधिकारी संबंधित वनरक्षक व तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांना वाचवण्याची भूमिका घेत असल्यामुळे संपूर्ण प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्याच्या निषेधार्थ वन भवन येथे गांधीगिरी पद्धतीने विद्यमान वनपरिक्षेत्र अधिकारी यांना गुलाब पुष्प देऊन आंदोलन करण्यात आले. याबाबत येत्या पंधरा दिवसात संबंधित वनरक्षक व तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची चौकशी करावी अन्यथा वन विभागाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष सचिन मोहिते, तालुका प्रमुख अनिल गुजर, मोहन इंगळे, रमेश सावंत, प्रशांत शेळके, हरिभाऊ पवार, सुनील साळुंखे, संजय इंगवले, सागर धोत्रे, शिवराम मोरे, रामदास कदम, अजय सावंत, अक्षय जमदाडे, सागर रायते, निखिल पिंपळे, राहुल जाधव, महेश शेडगे उपस्थित होते.