maharashtra

निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन


निलंबन रद्द करून प्रलंबित पहिली आश्वासित प्रगती योजना लागू करावी या मागणीसाठी मनोहर कदम यांनी येथील सदरबझार परिसरात असणार्‍या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या बाहेर आंदोलन केले.

सातारा : निलंबन रद्द करून प्रलंबित पहिली आश्वासित प्रगती योजना लागू करावी या मागणीसाठी मनोहर कदम यांनी येथील सदरबझार परिसरात असणार्‍या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या बाहेर आंदोलन केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, दि. 29 नोव्हेंबर 2019 रोजी आपल्या संस्थेने मला सेवेतून निलंबित केले आहे. महाविद्यालयातील विकसीन समितीच्या सभेमधील ऐन वेळेच्या विषयांमध्ये याबाबतचा ठराव घेऊन आपण तशी शिफारस संस्था प्रशासनाकडे केल्यामुळे माझे निलंबन झाले. वास्तविक तसा ठराव सभेमध्ये झाला नाही. त्यामुळे माझे निलंबन चुकीचे आहे. मला माझ्या प्राकृतिक कारणांमुळे रजा घ्याव्या लागल्या. त्या सर्व बिनपगारी झाल्या आहेत. मार्च 2014 पासून डिसेंबर 2021 पर्यंत याच महाविद्यालयातील एक सेवक विनापरवानगी विनावेतन इतर आस्थापनामध्ये काम करीत होते. त्यामुळे माझे नीलमन रद्द करून प्रलंबित पहिली आश्वासित योजना लागू करावी. रोखलेल्या वेतन वाढीचा विचार करून महाविद्यालयामधील येणे- देणे व्यावहारिक माझी देय रक्कम मला देण्यात यावी.