आमच्या शरद पवारसाहेबांचा दुटप्पीपणा बघा. कोल्हापूरला जातात अन त्या ठिकाणी सांगतात शाहू महाराज यांच्या विरोधात तुम्ही उमेदवार उभा केला. हे किती चुकीचे आहे. त्यांना तुम्ही त्याठिकाणी बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होते. मग साताऱ्यात हे छत्रपती उदयनराजे महाराज नाहीत का? हे तुम्हांला का नाही आठवलं? जर तुम्हांला कोल्हापूरला आठवते तर साताऱ्यात का नाही आठवत?
संपूर्ण जगात दमदार नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. काहीही झालं तरी आपल्याला जिंकायचं आहे. उदयनराजे यांना निवडून द्या.. कामाचं आमच्यावर सोडा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
सदरबझारमध्ये असलेल्या उघड्या कॅनॉलमुळे येथील जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा कॅनल बंदिस्त करून या ठिकाणी अद्ययावत गार्डन केली जाणार आहे, अशी ग्वाही महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी दिली.
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेने उदयनराजे भोसले यांना लोकसभेसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदनही दिले. याबाबत नजीकच्या अधिवेशनात आपण मुद्दा उपस्थित करू असे आश्वासन उदयनराजे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
निवडून येणारे शोभेचे हत्ती अनेक असतात, पण जनतेला त्यांचा उपयोग काय? असा सवाल महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.
बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचा सत्कार केला. तसेच निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. येथील श्री बालाजी सहकारी पतसंस्थेत हा सत्कार सोहळा झाला.
आधी धरण नंतर पुनर्वसन ही लोकप्रतिनिधींची भूमिका होती. मात्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून धरणांची कामे करत असताना धरणाचे काम आणि पुनर्वसन एकाच वेळी सुरू राहिले पाहिजे, अशी मी भूमिका घेतली. त्यानंतर सध्याचा पुनर्वसन कायदा अस्तित्वात आला, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
वाई तालुक्यातील खंडाळा आणि भुईंज या दोन्ही किसन वीर सहकारी साखर कारखान्यांच्या भवितव्यासाठी मी आमदार मकरंद पाटलांना लागेल ती मदत करायला तयार असून त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहीन, असा विश्वास सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
सहकारी साखर कारखान्यांना कोट्यवधीच्या आयकर नोटीसा बजावल्या, तेव्हा महाराष्ट्रातील कथीत थोर नेते सत्तेवर होते. आयकराच्या बोजातून त्यांनी कारखान्यांना का बाहेर काढले नाही? ही जनता वाडगं घेऊन आपल्या मागे मागे फिरली पाहिजे, अशी त्यांची भावना होती.
पाटण मतदारसंघाचे कार्यकुशल नेतृत्व शंभूराज देसाई यांनी विकास कामांचा विडा उचलला आहे. सर्वांनी एकीने काम करूया, विभागाला निधी कधी कमी पडू देणार नाही,असा ठाम निर्धार खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे देशाच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातार्याची छत्रपती शिवरायांची गादी महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा सन्मान आहे. हा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी छत्रपतींचे वंशज असणार्या खासदार उदयनराजे भोसले यांना मतदारांनी निवडून द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले.
लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, "महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याचे माझ्यावर खूपच प्रेम आहे. मला विरोध करण्यासाठी ते जिल्ह्यात चार सभा घेणार आहेत."
दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुती मित्रपक्ष व भाजपचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना पाठिंबा जाहीर केला.
सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रचारासाठी दिनांक 29 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सैदापूर येथे शेतकी मैदानावर सभा होत आहे. ही सभा यशस्वी करून या सभेतूनच उदयनराजे यांच्या विजयाची नांदी होईल, असा ठाम विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराची ज्या पद्धतीने आधीच तयारी करता, तशीच तयारी करून वाट न पाहता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लागा, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहरातील सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी व भाजपच्या आजी माजी पदाधिकार्यांना केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 30 एप्रिल रोजी ता. कराड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या जागेची पाहणी उदयनराजे भोसले यांनी केली.
सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीमधील भाजप चे अधिकृत उमेदवार श्री.छ. उदयनराजे भोसले यांना राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक विक्रमी मतदाधिक्क्याने निवडून आणण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी केला आहे.
आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळालेच पाहिजे. हे होत असताना जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे, अशी रोखठोक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर येथे मांडली.
आपला देश हा कृषीप्रधान आहे. अनेक देशांची अर्थव्यवस्था वेगवेगळ्या विषयांवर अवलंबून असते. मात्र, भारताची अर्थव्यवस्था कृषी वर अवलंबून आहे. त्यामुळे या देशातील शेतकरी सधन होण्याची गरज आहे. यासंबंधी मार्गदर्शन आणि माहिती घेण्यासाठीच छत्रपती कृषी, औद्योगिक, वाहन महोत्सवाकडून इतरांनी बोध घ्यावा, असे प्रतिपादन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
सातारा पालिकेत विरोधकांची तीन दशके सत्ता होती. त्यावेळी काय विकासकामे झाली, हे सगळयांनाच ठाऊक आहे. त्यांनी ज्या विकासकामांचे आश्वासन दिले त्यांच्या फक्त घोषणाच झाल्या. सातारा विकास आघाडीने केवळ बोलले नाही तर करून दाखविले.
आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुढील सप्ताहामध्ये छत्रपती उदयनराजे मित्र समुहाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी पुष्पचक्र अर्पण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तत्पूर्वी चेंबुर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन उदयनराजेंनी अभिवादन केले.
कोणत्याही मिळकतींवर अवाजवी घरपट्टी आकारली जाणार नाही याची दक्षता सातारा विकास आघाडीने घेतली आहे.
राज्यपाल भगवान कोश्यारी यांना महाराष्ट्राचा जर तिटकारा असेल तर त्यांनी येथे न थांबता दुसऱ्या राज्यात जावे अशी सणसणीत टिका भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांनी सोशल मिडियाद्वारे केली आहे . कोश्यारी यांच्या वक्तव्याचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. उदयनराजे यांनी राज्यपालांचा जोरदार समाचार घेतला आहे.
खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या अफलातून कार्यशैलीमुळे सातत्याने चर्चेत असतात. काही दिवसापूर्वी भाजपच्या आमदारांना धमकी देणाऱ्यांना माझ्यावर सोपवा मी बघून घेतो, असा शब्द उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. या चर्चेत असलेले उदयनराजे येथील सेव्हन स्टार चित्रपटगृहात भिरकिट चित्रपट पाहण्यासाठी तीनशे कार्यकर्त्यांसह उपस्थित झाले.
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर उत्स्फूर्त भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये वेगवेगळ्या राजकीय विषयांवर चर्चा झाली. या भेटीचे राजकीय वर्तुळामध्ये चांगलेच पडसाद उमटले आहेत. या भेटीमध्ये उदयनराजे यांनी फडणवीस यांच्या कुशल रणनीतीबद्दल पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले.
खंबाटकी बोगद्यात जमिनी गेलेल्या वेळे, वाण्याचीवाडी, खंडाळा या तीन गावांतील शेतकर्यांच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आपण केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार असून प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचा शब्द खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी प्रकल्पग्रस्तांसमवेत झालेल्या बैठकीत दिला.
राष्ट्रवादीच्या नेत्यांना कायमच शिंगावर घेणाऱ्या माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांची शनिवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी झालेली भेट जिल्ह्याच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. ही भेट अतिशय अनौपचारिक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सातारा शहरासह विस्तारित भागातील नागरिकांना सोयी-सुविधा देण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून शासनाने ४८ कोटी रुपये मंजूर केले. पैकी २५ कोटींचा निधी पालिकेकडे आला असून मे अखेर आणि २३ कोटी रुपये जमा होतील. शहराच्या पूर्वेला असणाऱ्या विलासपूर भागाच्या पायाभूत सुविधांसाठी बारा कोटी रूपये दिले जाणार आहेत, अशी माहिती येथील युवा उद्योजक संग्राम बर्गे यांनी दिली.
यादोगोपाळ पेठेतील मालशे पुलालगत नैसर्गिक ओढा बेकायदेशीररित्या बंदिस्त करून विकसकाला परस्पर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असा आरोप खा. उदयनराजे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत झाल्याने खासदारांनी तातडीने बैठकीनंतर मालशे पुलाची पाहणी केली. ओढ्यांचा नैसर्गिक प्रवाह अडवू नका येथील अतिक्रमणे तत्काळ काढून टाका, असे स्पष्ट आदेश खा. उदयनराजे यांनी पालिका प्रशासनाला दिले.
किसनवीर कारखाना निवडणुकीत केलेल्या अभूतपूर्व सत्तांतरानंतर आमदार मकरंद आबा पाटील यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. जलमंदिर येथे मकरंद आबा यांना पाहताच खा. उदयनराजे यांनी आपल्या स्टाईलमध्ये ‘जिल्ह्याचे बॉस आले’ असे म्हणून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
सातारा जिल्ह्यातील विकास कामे आम्ही लोकांच्या मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार सुचवित असतो. या कामांची अनावश्यक अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा बिलकुल मुलाहिजा ठेवला जाणार नाही. लोकांच्या हितासाठी असणारी विकास कामे वेळेत मार्गी लागायला हवीत, अशा स्पष्ट कानपिचक्या खासदार उदयनराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन केले जावे यासाठी गेल्या काही वर्षापासून सुरु असलेला लढा हा अधिवक्त्यांबरोबरच पक्षकार जनतेच्या हितासाठी आहे. त्यामुळे या लढ्याला आमचा जाहिर पाठीवा आहेच परंतु आम्हास जे काही करावे लागेल ते सर्वकाही निश्चितपणे आमच्याकडून केले जाईल, अशी ग्वाही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.
सातार्यात काही दिवसातच सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. त्या अगोदरच दोन्ही राजेंकडून एकमेकांवर हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान भाजपचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चला हवा येऊ द्या कार्यक्रमात बाईकवरून हवेतून एन्ट्री केली होती. त्यावर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खोचक टीका केली. त्याच्या टीकेला उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही, असा पलटवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरु होते, असे वक्तव्य करून शिवप्रेमींच्या तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांनी आपले वक्तव्य करीत मागे घ्यावे, असे ट्विट खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले. मात्र काही वेळातच उदयनराजे यांनी ट्विट डिलीट करून दुसरे ट्विट करून राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आज दिवसभर राजकीय वर्तुळात उदयनराजे भोसले यांनी डिलिट केलेल्या ट्विटची चर्चा जोरात सुरू होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग आणि तत्सम स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या आणि त्याकरता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये प्रवेश घेण्याकरता जे शुल्क लागते त्यामध्ये सवलत देण्याचे नियोजन कैलासवासी श्रीमंत छत्रपती दादा महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून देण्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून चोरट्यांनी दोन जणांच्या ३ लाख ८ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याची चैन चोरून नेल्याच्या तक्रारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे केंद्राची जबाबदारी आहे. युद्धाचा परिणाम फक्त भारतावरच नाही तर प्रत्येकाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे, असे मत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
आपल्या हटके स्टाईल साठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला हटके अंदाज पुन्हा एकदा दाखवून दिला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या सेटवर उदयनराजे यांनी मोटार बाईकवर स्वार होत थेट साठ फूट उंच हवेतून स्टेजवर एन्ट्री केली. राजेंच्या या थरारक एंट्रीला सातारकरांनी टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.
खासदार उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस असून त्यांनी बुधवारी जाहीर केल्यानूसार काही वेळापुर्वीच मोठ्या घोषणेतील एक घोषणा त्यांनी ट्विट करुन केली आहे. उदयनराजेंनी शिवछत्रपतींनी उभारलेला स्वराज्यलढा आधुनिक पद्धतीने शालेय मुला-मुलींपर्यंत पोहोचवणारा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमास त्यांनी 'मावळ्यांची शाळा' असे नमूद केले आहे.
सातारा : Udayanraje Bhosale Emotional : शिवजयंतीनिमित्ताने (Shiv Jayanti) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल बोलताना खासदार उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosle) भावूक झालेले पाहायला मिळालेत. त्या काळात आपण जन्माला आलो असतो तर मावळा म्हणून धन्य झालो असतो, असे खासदार उदयनराजे म्हणाले. एवढे मोठ मोठे नेते बघितले. मात्र 300 वर्षानंतरही छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा असा मोठा जल्लोष पाहून ते खूप महान होते हेच द...
राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविल्यानंतर देगावच्या माळावर प्रथमच बैलगाडा शर्यतींचा थरार जोरकसपणे रंगला. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेमध्ये हातात कासरा डोक्यात मुंडासं अशा खास पेहरावात उदयनराजे यांची बैलगाडीतून एन्ट्री झाल्यानंतर देगावच्या माळावर एकच जल्लोष झाला. या स्पर्धेसाठी सुमारे दहा हजाराहून अधिक लोक जमा झाले होते.
सातारा-मिरज रेल्वे दुहेरी ट्रॅकच्या कामाचा खासदार उदयनराजे भोसले यांनी विभागीय व्यवस्थापकांच्या बैठकीत आढावा घेतला. सातारा जिल्ह्यातील रेल्वे विभागातील विविध नवीन कामांच्या पाठपुराव्यासाठी तसेच सध्या होत असलेल्या काही त्रुटींसंदर्भात आज डीआरएम ऑफिस येथे सर्व रेल्वे अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली व मार्ग काढण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
साताऱ्यात भाजपचे खासदार ‘उदयनराजे भोसलेंचा’ अंदाज नेहमी हटके असतो. ते कधी काय करतील याचा कोणालाच अंदाज लागत नाही. राजकीय परिणामांची भीती न बाळगता त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे यापूर्वी राज्यात धुरळा उडवून दिला होता. मजबूत शरीरयष्टी, भेदक नजर, तडकाफडकी जागेवर निकाल लावण्याच्या त्यांच्या वृत्तीचा साताऱ्यातच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात बोलबाला असतो.
सातारा नगरपालिका ही आदर्श नगरपालिका व्हायला हवी, हीच आमची अपेक्षा आहे. आम्ही कामे करतो म्हणूनच नारळ फोडतो. तुम्ही समोरासमोर चर्चेला कधीही या मी तयार आहे, असे खुले आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता दिले.
सातारा विकास आघाडीने त्रिशंकू भागामध्ये समत्व भावाने विकास साधण्याची भूमिका ठेवली आहे. या भूमिकेशी आम्ही सातत्याने कटिबद्ध राहणार आहोत, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
अद्ययावत सुविधांनी युक्त आणि रंगकर्मीचे हक्काचे व्यासपीठ असणारे शाहू कला मंदिर दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर रसिकांसाठी खुले झाले. येथील सुविधांसह नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
100 जागांच्या मान्यतेसह सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रीयेस आपण दिलेल्या मान्यतेबाबत आपले विशेष आभार, कोरोनाच्या काळातच आपण मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. कोरोनामुळे सामान्य व्यक्तींची झालेली ससेहोलपट आपण जवळून पाहिली आहे. अनुभव फार मोठा शिक्षक आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडसाद उमटू लागले असून अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आलीय. या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्र राज्यातही उमटण्यास सुरुवात झालीय. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनीही कर्नाटक प्रशासनाला कडक शब्दांत इशारा दिलाय.
झुंजार सैनिकी परंपरा लाभलेल्या सातारच्या भूमीत लष्कर/सैन्य भरती केंद्र सुरु करावे, आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मिलिटरी हॉस्पिटल किंवा कमांड हॉस्पिटलच्या अखत्यारितील वैदयकिय उपकेंद्र तातडीने सुरु करावे या प्रमुख मागण्यासह विविध प्रश्नांबाबत निर्णय घेणेबाबत आज खासदार उदयनराजे भोसले यांनी देशाचे संरक्षण मंत्री ना.राजनाथसिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेवून चर्चा केली.
भारत सरकारच्या डाक विभागामार्फत प्रामुख्याने बचतीच्या आणि गुंतवणुकीच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. त्यातीलच सुकन्या समृध्दी ही योजना प्रत्येक कन्यारत्न लाभलेल्या पालकांची बचती बरोबरच भविष्यकालिन चिंता मिटवणारी योजना आहे.
देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या सहकुटुंब सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर गेल्या होत्या. महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन त्या मंगळवारी पुण्याकडे निघाल्या होत्या. पुण्याकडे जात असताना त्या सकाळी 11 च्या सुमारास सातारा येथील सर्किटवर पोहचल्या.
जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांनी सोमवारी ८ रोजी कराडात मॅरेथॉन दौरा केला. त्यामध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, अँड. उदयसिंह पाटील-उंडाळकर व डॉ. अतुल भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. यामध्ये त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने तिघांशीही राजकीय चर्चा केली.
राज्यसभेचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले कधी काय करतील, याचा नेम नसतो. त्याचाच प्रत्यय आज फलटणकरांना आला. सातारच्या राजकारणात एकमेकांचे जानी दुश्मन म्हणून ओळखले जाणारे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी जात खा. उदयनराजेंनी जिल्हावासीयांना पुन्हा एकदा जोर का झटका धीरे से दिया.
उदयनराजेंचे सल्लागार त्यांना चुकीचा सल्ला देत आहेत. बँकेचे कामकाज अत्यंत उत्तमरित्या सुरू असून संपूर्ण भारतात ही बँक नावाजलेली आहे त्यामुळे काहीही बोलून बँकेची बदनामी करणे थांबवावे. जरंडेश्वर कारखान्याला कर्ज देताना घेण्यात आलेले आहे. कारखान्याला दिलेले कर्ज हे नियमित परतफेड केले जात आहे. बँकेचे ऑडिट नाबार्डच्या माध्यमातून वेळोवेळी होत असते बँकेत जर चुकीचे काही घडले असते तर बँकेचे कौतुक देशभर झाले नसते.
सातारच्या आयटीआयच्या क्रीडांगणाचा योग्य विकास, आयटीआय प्रमाणपत्र पात्र विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी, विद्यार्थी व प्रशासनाच्या विविध समस्या, इत्यादी बाबत दीपावलीनंतर तंत्र शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, इ. विभागांची संयुक्त बैठक घेवून या समस्या मार्गी लावल्या जातील, असे आश्वासन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले.
सैनिक आहेत म्हणून देश आणि जनता सुरक्षित आहे. हीच जाणीव ठेऊन सातारा पालिका आणि मी स्वतः आजी- माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांसाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त दिली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही देशातील सहकारामधील एक अग्रगण्य बँक आहे. या बँकेत फारसे राजकारण नाही, हे सांगायला बरं वाटतं म्हणण्यापेक्षा अभिमान वाटतो. या बँकेच्या माध्यमातुन हौसिंग सोसायटी आणि दुग्ध संस्थांचे प्रतिनिधीत्व करताना, सहकाराचा जास्तीत जास्त लाभ सभासदांना होण्यासाठी प्रयत्न केला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्याच्या दृष्टीने, सर्वसाधारण रुग्णालयालगत उभारण्यात येत असलेल्या विविध सुविधांची म्हणजेच दोन लेक्चर हॉल, लॅबोरेटरी, डिसेक्शन हॉल आणि पहिल्या मजल्यावर लायब्ररी, डेमो रूम, एचओडी रुम्स, इत्यादी कामांची पहाणी आज खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी केली.
सातारा पालिकेच्या शिक्षण मंडळाच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खासदार उदयनराजें भोसले यांच्या हस्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने कोणताही गाजावाजा न करता पार पडला.
मोक्कातील आरोपींना न्यायालयाकडून जामीन मिळणे ही अत्यंत धोकादायक बाब असून भविष्यात अशा घटना टाळायच्या असतील तर पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी, सरकारी वकील यांची याप्रकरणी चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी अशी मागणी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात दुचाकीवरून जाऊन विकास कामांचे उद्घाटन केले होते. त्यावर आमदार शिवेंद्रराजे यांनी टोला लगावत नगरपालिका नीट चालवली असती तर दुचाकी चालवायची वेळ आली नसती, असे म्हंटले होते. यावर उदयनराजे यांनी आज किल्ले प्रतापगड येथे त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर बीएमडब्लू कंपनीची एक्स फाईव्ह ही नवीन कोरी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत एक कोटी रूपये असून त्यांनी या ही कारला एमएच ११ डी डी ००७ हा त्यांचा लकी नंबर घेतला आहे.
सातारा शहराची हद्दवाढ झाली आहे. शाहुनगर,विलासपूर, गोडोली हा संपूर्ण भाग शहर हद्दीत समाविष्ट झाला आहे. येथील रहिवासी नागरीकांच्या सोयीसाठी गोडोली येथे स्वतंत्र नवीन तलाठी सजा व कार्यालय निर्माण करावे, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारचे जिल्हाधिकारीशेखर सिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.