maharashtra

यादोगोपाळ पेठेतील मालशे पुलाच्या विकसन कामाची खा. उदयनराजे यांच्याकडून पाहणी

ओढा खुला करण्याचे सातारा पालिका प्रशासनाला आदेश

Development work of Malshe bridge at Yadogopal Peth : Survey by Udayanraje
यादोगोपाळ पेठेतील मालशे पुलालगत नैसर्गिक ओढा बेकायदेशीररित्या बंदिस्त करून विकसकाला परस्पर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असा आरोप खा. उदयनराजे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत झाल्याने खासदारांनी तातडीने बैठकीनंतर मालशे पुलाची पाहणी केली. ओढ्यांचा नैसर्गिक प्रवाह अडवू नका येथील अतिक्रमणे तत्काळ काढून टाका, असे स्पष्ट आदेश खा. उदयनराजे यांनी पालिका प्रशासनाला दिले.

सातारा : यादोगोपाळ पेठेतील मालशे पुलालगत नैसर्गिक ओढा बेकायदेशीररित्या बंदिस्त करून विकसकाला परस्पर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असा आरोप खा. उदयनराजे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत झाल्याने खासदारांनी तातडीने बैठकीनंतर मालशे पुलाची पाहणी केली. ओढ्यांचा नैसर्गिक प्रवाह अडवू नका येथील अतिक्रमणे तत्काळ काढून टाका, असे स्पष्ट आदेश खा. उदयनराजे यांनी पालिका प्रशासनाला दिले. उदयनराजे यांना उत्तरे देताना बांधकाम विभागाची चांगलीच तंतरली.
मालशे पूल विकसन प्रकरणात कागदावर नऊ मीटरचा रस्ता दाखवून प्रत्यक्षात पोलाची भिंत 50 फूट आत बांधण्यात आल्याने प्रशासनाची अडचण झाली आहे माजी नगरसेविका दीपाली गोडसे यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने तत्काळ जागेची पाहणी करून सार्वजनिक क्षेत्रातील रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन दिले खासदार उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर येथे आयोजित केलेल्या बैठकीमध्ये सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांकडून तक्रारीचा पाऊस पडला यामध्ये मालशे पुलाचे चुकीच्या पद्धतीने पुलाचे रुंदीकरण करून खासगी विकसकाला जागा उपलब्ध करून देण्याचा प्रकार घडल्याची तक्रार सप्त तारा सार्वजनिक मित्र मंडळाचे अध्यक्ष राजू गोडसे यांनी केली या तक्रारींची गंभीर दखल खासदार उदयनराजे भोसले यांनी घेत बैठकीनंतर तातडीने मालशे पुलाची पाहणी केली या पाहणीमध्ये फुलाची दगडी कमान आर्च पद्धतीची बांधलेली असताना त्यातूनच दोन मीटर व्यासाचा पाइप बाहेर काढून त्याचे पात्र बंदिस्त करण्यात आल्याचे पाहणीत निदर्शनास आले डीपी प्लॅन मध्ये रस्ता नऊ मीटरचा असताना प्रत्यक्षात पुलाची भिंत शंभर फूट आत बांधण्यात आली आहे येथील जागा ही जिल्हाधिकार्‍यांच्या मालकीची असताना त्याच्या लगतचा प्लॉट विकसकाला कसा उपलब्ध होईल याकरिता नगरपालिकेकडून 51 लाख रुपये खर्च करून पुलाचे विकसन करण्याचा उद्योग काही मंडळींनी केला होता त्या प्रकरणाची दखल उदयनराजे भोसले यांनी घेत प्रत्यक्ष पाहणीनंतर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. ओढयाचा प्रवाह तातडीने मोकळा करून चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या पुलाची भिंत तातडीने पाडण्याचे आदेश दिले .
यावेळी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे शहर विकास विभागाचे प्रकाश राजेशिर्के श्रीकांत गोडसे मंडळ निरीक्षक प्रशांत निकम मूळ तक्रारदार सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष संतोष शेंडे सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे व बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप चिद्रे उपस्थित होते.