छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडसाद उमटू लागले असून अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आलीय. या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्र राज्यातही उमटण्यास सुरुवात झालीय. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनीही कर्नाटक प्रशासनाला कडक शब्दांत इशारा दिलाय.
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडसाद उमटू लागले असून अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आलीय. या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्र राज्यातही उमटण्यास सुरुवात झालीय. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनीही कर्नाटक प्रशासनाला कडक शब्दांत इशारा दिलाय.
खासदार उदयनराजे यांनी कर्नाटक प्रशासनाला इशारा देताना म्हंटलंय, संपूर्ण भारताची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना झालीय. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. सरकारनं त्या समाजकंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करावी, असा इशारा त्यांनी ट्विटव्दारे दिलाय. कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवलाय.
संपूर्ण भारताची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना झाली. त्याचा आम्ही तिव्र शब्दात निषेध करतो. या घटनेचे देशभरात पडसाद उमठत आहेत. सरकारने त्या समाजकंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी.
बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्याने याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. शुक्रवारी रात्री हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर संतप्त जमावानं केलेल्या दगडफेकीत 20 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याने खबरदारी म्हणून शहर आणि तालुक्यात जमावबंदी लागू करण्यात आली. त्यातच अनगोळ येथील संगोळी रायान्ना यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी विटंबना केलीय. या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्यरात्रीपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केले असून खबरदारी म्हणून तालुक्यात कलम 144 नुसार जमावबंदीचा आदेश पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी जारी केला आहे.