maharashtra

आजी-माजी सैनिकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील : उदयनराजे


Efforts for the welfare of ex-servicemen: Udayanraje
सैनिक आहेत म्हणून देश आणि जनता सुरक्षित आहे. हीच जाणीव ठेऊन सातारा पालिका आणि मी स्वतः आजी- माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांसाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त दिली.

सातारा : सैनिक आहेत म्हणून देश आणि जनता सुरक्षित आहे. हीच जाणीव ठेऊन सातारा पालिका आणि मी स्वतः आजी- माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांसाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त दिली.
सातारा पालिकेच्या वतीने शहरात आजी- माजी सैनिकांच्या मुलामुलींसाठीच्या वसतिगृहात विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण नुकतेच खासदार भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. वसतिगृहामध्ये ओपनजीम, सोलरसिस्टीम, आरओ वॉटर प्लँटचे उद्‌घाटन, तर अथितीगृह, स्वच्छतागृहाचे या वेळी खासदार भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
त्या वेळी नगराध्यक्षा माधवी कदम, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कमांडर श्री. पाटील, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, पालिकेचे उपाध्यक्ष मनोज शेंडे, वसतिगृहाच्या अधीक्षिका श्रीमती जयकर, मेजर जरे, कर्नल गोरे, कर्नल जाधव, ॲड. दत्ता बनकर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. खासदार भोसले म्हणाले, ‘‘आजी- माजी सैनिक हे देशाचे खरे आधारस्तंभ आहेत. ते आपल्या रक्षणासाठी अहोरात्र सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत कार्य करत असतात. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी दूर करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. आमचे सहकारी श्री. माळवदे हेही माजी सैनिक असून, त्यांनी सुचविलेली सर्व कामे या वसतिगृहात केली जात आहेत. यापुढेही जी लागेल ती मदत केली जाईल.’’