maharashtra

कोल्हापूर खंडपीठाकरीता आमचा जाहीर पाठींबा :  खा. श्री. छ. उदयनराजे भोसले

पक्षकार जनता आणि अधिवक्ता यांच्या हितासाठी खंडपीठ होणे आवश्यक

Our support for Kolhapur Bench: Udayanraje Bhosle
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन केले जावे यासाठी गेल्या काही वर्षापासून सुरु असलेला लढा हा अधिवक्त्यांबरोबरच पक्षकार जनतेच्या हितासाठी आहे. त्यामुळे या लढ्याला आमचा जाहिर पाठीवा आहेच परंतु आम्हास जे काही करावे लागेल ते सर्वकाही निश्चितपणे आमच्याकडून केले जाईल, अशी ग्वाही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.

सातारा : लोकतांत्रिक भारतातील पुरोगामी महाराष्ट्रात न्यायदानाचे कार्य अधिक सुलभ झाले पाहीजे. कायद्याच्या राज्यामध्ये जलदगतीने, वेळेची आणि पैशाची बचत होवून नागरीकांना न्याय मागता आला पाहीजे. त्यासाठी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन केले जावे यासाठी गेल्या काही वर्षापासून सुरु असलेला लढा हा अधिवक्त्यांबरोबरच पक्षकार जनतेच्या हितासाठी आहे. त्यामुळे या लढ्याला आमचा जाहिर पाठीवा आहेच परंतु आम्हास जे काही करावे लागेल ते सर्वकाही निश्चितपणे आमच्याकडून केले जाईल, अशी ग्वाही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या अध्यक्ष अँड. गिरीश खडके, सचिव अॅड. विजयकुमार तोटे-देशमुख आणि पदाधिकारी यांनी आज जलमंदिर पॅलेस येथे कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन होण्याबाबत कृती समितीच्या पुढील कार्यवाहीची माहीती दिली.
यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले,  सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग-रत्नागिरी हे सहा जिल्हे भौगोलीकदृष्ट्या सलग्न आहेत.  कोल्हापूर हे साधारण या सहा जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती केंद्र आहे. कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ झाल्यास, वकीलांना आणि पक्षकारांना अत्यंत सोयीचे होणार आहे. पक्षकारांना उच्च न्यायालयात दाद मागण्याची असल्यास सध्या मुंबई, औरंगाबाद, नागपूर, पणजी या चारच ठिकाणी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावता येत आहेत.
 गेल्या २० वर्षापासुन ही उच्च न्यायालयाची व्यवस्था आहे. सध्याची लोकसंख्या, वाढते खटल्याचे प्रमाण आणि जलद न्यायासाठी कोल्हापूर येथे खंडपीठ झाल्यास ते सर्वांनाच अतिशय सोयीचे होणार आहे. आजच्या घडीला न्याय मागण्यासाठी सुध्दा एक प्रकारे अन्याय होत असल्याची भावना सर्वसाधारण पक्षकारांना वाटते. त्यासाठी तातडीने कोल्हापूर येथे खंडपीठ होणे आवश्यक आहे. वकील, पक्षकार यांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे. न्याय मागणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे आमचा सर्वार्थाने कृती समितीला पाठींबा राहीला आहे आणि येथुन पुढेही राहणार आहे.
कोल्हापूर खंडपीठाकरीता जे काही करायचे असेल ते सर्वार्थाने आम्ही करु अशी ग्वाही आम्ही देतो. यावेळी कोल्हापूर आणि सातारा वकील संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.