बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचा सत्कार केला. तसेच निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. येथील श्री बालाजी सहकारी पतसंस्थेत हा सत्कार सोहळा झाला.
सातारा : बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचा सत्कार केला. तसेच निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. येथील श्री बालाजी सहकारी पतसंस्थेत हा सत्कार सोहळा झाला.
याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन जगदीश खंडेलवाल, जयदीप शिंदे, हरिदास साळुंखे, संजय कदम, नितीन माने, उदय गुजर यांच्यासह पतसंस्थेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजेंद्र चोरगे यांनी मतदाना दिवशी मोठ्या संख्येने मतदारांना मतदानासाठी प्रेरित करूया, असे सांगितले. तसेच उदयनराजेंना लोकसभा निवडणुकीच्या बालाजी परिवारातर्फे शुभेच्छा दिल्या.