maharashtra

वैद्यकीय महाविद्यालयाची यंदाची प्रवेश प्रक्रीया सुरळीत सुरु झाली पाहीजे : खा. उदयनराजे भोसले


This year's admission process of medical college should start smoothly: Udayanraje Bhosle
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्याच्या दृष्टीने, सर्वसाधारण रुग्णालयालगत उभारण्यात येत असलेल्या विविध सुविधांची म्हणजेच दोन लेक्चर हॉल, लॅबोरेटरी, डिसेक्शन हॉल आणि पहिल्या मजल्यावर लायब्ररी, डेमो रूम, एचओडी रुम्स, इत्यादी कामांची पहाणी आज खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी केली.

सातारा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्याच्या दृष्टीने, सर्वसाधारण रुग्णालयालगत उभारण्यात येत असलेल्या विविध सुविधांची म्हणजेच दोन लेक्चर हॉल, लॅबोरेटरी, डिसेक्शन हॉल आणि पहिल्या मजल्यावर लायब्ररी, डेमो रूम, एचओडी रुम्स, इत्यादी कामांची पहाणी आज खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी केली. यावेळी या महाविद्यालय यंदाची प्रवेश प्रक्रीया सुरळीत सुरु झाली पाहीजे त्या दृष्टीने सर्वांनीच योगदान द्यावे, असे मत खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
आज खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी सातारा सिव्हील हॉस्पिटलच्या परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उपलब्ध सुविधांची पहाणी केली यावेळी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रविंद्र चव्हाण, उपअधिष्ठाता डॉ. संजय गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजूरी करीता आणि उभारणीकरीता आज पर्यंत अनेक अडथळे आले तरी देखील अनेकांचे सहकार्य लाभलेले आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदाच्या वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रीया सुरळीत सुरु होणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य विज्ञान परिषद, राज्यशासन आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डिन) यांच्या संयुक्त प्रयत्नातुन आता पुढील प्रवेश कार्यवाही होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आमचे लागेल ते सहकार्य राहीले आहे आणि यापुढेही राहणार आहे.
तसेच प्रयोगशाळा इमारतीच्या जागेची पहाणी केली. नवीन स्त्री रुग्णालयाला आवश्यक असणारी मुबलक जागा, सिव्हील रुग्णालयाच्या परिसरातच सुमारे ४६ गुठे उपलब्ध ठिकाणी नवीन स्त्री रुग्णालय उभारण्याबाबत सूचित करून त्याही जागेची पहाणीही यावेळी खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. कोणत्याही प्रशासकीय कारणास्तव यंदाची प्रवेश प्रक्रीया रखडली गेली तर त्याबाबत संबंधीतांना जाब द्यावा लागेल. आता सर्व सोपस्कार पूर्ण झाले असल्याने आता आम्हाला यंदापासून प्रवेश प्रक्रीया सुरु झालेली पाहीजे असे नमुद करुन खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाविद्यालयाच्या उपयोगी असणाऱ्या विविध सुविधाची पहाणी करून, समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी काका धुमाळ, आबा इंगळे, सचिन नलवडे, सचिन आगाणे, उपअभियंता सार्व बांधकामचे अहिरे व जावेकर यांचेसह वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक हॉस्पिटलचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.