भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी पुष्पचक्र अर्पण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तत्पूर्वी चेंबुर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन उदयनराजेंनी अभिवादन केले.
सातारा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी पुष्पचक्र अर्पण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तत्पूर्वी चेंबुर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन उदयनराजेंनी अभिवादन केले. दरम्यान, दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सातारा टुडेचे संपादक संग्राम निकाळजे, चंद्रकांत पाटील, समृध्दी जाधव, जितेंद्र खानविलकर, प्रविण धस्के आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा भीमसागर चैत्यभूमीवर लोटला होता. अगदी तान्हुल्यापासून वयोवृध्दांपर्यंत सर्व वयोगटातील अनुयायांच्या चैत्यभूमीवर रांगा लागल्या होत्या. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षापासून निर्बंध असल्याने मोठ्या संख्येने अनुयायांना चैत्यभूमीवर येता आले नाही. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने तीन दिवस आधीपासूनच लाखो अनुयायांचे चैत्यभूमीवर आगमन झाले होते. चैत्यभूमीच्या दिशेने येणारे अनुयायांचे जथ्थेच्या जथ्थे व त्यांना शिस्तीने सोडणारे स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, संघटना, चळवळीतील कार्यकर्ते दादर रेल्वेस्थानक ते चैत्यभूमी शिवाजी पार्कच्या दिशेने अत्यंत शिस्तीने चालणारे लाखो भीमसैनिक पोलिसांना सहकार्य करत होते. चैत्यभूमीवरील गर्दी पाहता कायदा सुव्यवस्थेसाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.


