maharashtra

खासदार उदयनराजे भोसले यांची कार्यकर्त्यांसमवेत 'भिरकीट'

सेव्हन स्टार चित्रपटगृहात लुटला चित्रपटाचा आनंद

Udayanraje Bhosale's 'Bhirkit' with activists
खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या अफलातून कार्यशैलीमुळे सातत्याने चर्चेत असतात. काही दिवसापूर्वी भाजपच्या आमदारांना धमकी देणाऱ्यांना माझ्यावर सोपवा मी बघून घेतो, असा शब्द उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. या चर्चेत असलेले उदयनराजे येथील सेव्हन स्टार चित्रपटगृहात भिरकिट चित्रपट पाहण्यासाठी तीनशे कार्यकर्त्यांसह उपस्थित झाले.

सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या अफलातून कार्यशैलीमुळे सातत्याने चर्चेत असतात. काही दिवसापूर्वी भाजपच्या आमदारांना धमकी देणाऱ्यांना माझ्यावर सोपवा मी बघून घेतो, असा शब्द उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. या चर्चेत असलेले उदयनराजे येथील सेव्हन स्टार चित्रपटगृहात भिरकिट चित्रपट पाहण्यासाठी तीनशे कार्यकर्त्यांसह उपस्थित झाले. उदयनराजेंनी आपल्या नव्या आणि जुन्या अशा तीनशे समर्थकांसह राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या भिरकिट चित्रपटाचा आनंद लुटला. त्यामुळे उदयनराजेंचा एंटरटेनमेंट प्रोग्राम चांगलाच चर्चेत राहिला आहे.
खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या अफलातून कार्यशैलीमुळे तसेच बेधडक विधाने व धक्कातंत्रामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळे वजन ठेवून आहेत. राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्यमध्ये धमकी देणार्‍यांना बघून घेऊ, असा इशारा देऊन उदयनराजे यांनी महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. साताऱ्यात सोमवारी रात्री उदयनराजे भोसले यांनी आपल्या तीनशे कार्यकर्त्यांना घेऊन येथील सेव्हन स्टार चित्रपटगृहांमध्ये चित्रपटासाठी आपल्या समर्थकांसह लावलेली हजेरी ही आगामी पालिका निवडणुकांचा स्टंट होती काय ? अशी चर्चा रंगली.
आगामी नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सातारा विकास आघाडी चा गेम प्लॅन सुरू असून तो कायमच केंद्रबिंदू राहण्यासाठी उदयनराजे यांचा फंडा सुरू झाला आहे. यंदा सातारा विकास आघाडीच्या गोटात बरेच नवे चेहरे दिसणार आहेत. उदयनराजे यांची ऑन स्क्रीन भिरकीट मात्र चांगलीच चर्चेत राहिली.