maharashtra

खा. उदयनराजे भोसले यांच्या कार्यक्रमात चोरट्यांची दिवाळी

तीन लाख रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चैन लांबवल्या

Diwali of thieves in Udayanraje Bhosale's program
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून चोरट्यांनी दोन जणांच्या ३ लाख ८ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याची चैन चोरून नेल्याच्या तक्रारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

सातारा : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून चोरट्यांनी दोन जणांच्या ३ लाख ८ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याची चैन चोरून नेल्याच्या तक्रारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मिती इन्फोटेकने सातारा येथील गांधी मैदानावर मावळ्यांची शाळा हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. त्याचा फायदा उठवत चोरट्यांनी आशिष मधुकर शिंदे, वय ३१ रा. तामजाई नगर, सातारा यांची २ लाख ५० हजार रुपये किंमतीची सहा तोळ्याची सोन्याची चैन चोरून नेली. तर दुसरीकडे रोहित नामदेव लोहार, रा. बाबर कॉलनी, करंजे पेठ, सातारा यांची ५८ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.