maharashtra

खा. उदयनराजे भोसले यांनी मानले आरोग्य राज्य मंत्री ना. सौ. भारती पाटील यांचे आभार


Eat. Udayan Raje Bhosale considered Minister of State for Health no. Hundred Thanks to Bharti Patil
100 जागांच्या मान्यतेसह सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रीयेस आपण दिलेल्या मान्यतेबाबत आपले विशेष आभार, कोरोनाच्या काळातच आपण मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. कोरोनामुळे सामान्य व्यक्तींची झालेली ससेहोलपट आपण जवळून पाहिली आहे. अनुभव फार मोठा शिक्षक आहे.

सातारा : 100 जागांच्या मान्यतेसह सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रीयेस आपण दिलेल्या मान्यतेबाबत आपले विशेष आभार, कोरोनाच्या काळातच आपण मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. कोरोनामुळे सामान्य व्यक्तींची झालेली ससेहोलपट आपण जवळून पाहिली आहे. अनुभव फार मोठा शिक्षक आहे. आपण संभाव्य ओमिक्रॉन- कोरोना परिस्थिती निश्चितपणे चांगल्याप्रकारे हाताळाल अश्या शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भारताच्या आरोग्य राज्य मंत्री ना. सौ. भारती पाटील यांच्याबददल आभारयुक्त विश्वास व्यक्त केला.
सातारच्या वैदयेकीय महाविद्यालयास 100 जागांची मंजूरी दिल्याबद्दल आणि कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री ना. डॉ. भारती पवार यांची, त्यांच्या शासकीय कार्यालयात, सदिच्छा भेट घेतली त्याप्रसंगी झालेल्या चर्चेत ते बोलत होते.
सातारच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेशाकरिता 100 विद्यार्था जागां मंजूर केल्याबाबत ना. सौ. भारती पवार यांचे आभार  मानताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी फार मोठा जिकिरीचा प्रवास झाला आहे, असे स्पष्ट करताना नमुद केले की, प्रथम 500 खाटांची गरज पूर्ण करण्यासाठी 100 खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजूर करण्यात आले. त्यानंतर खावलीची जागा निश्चिती, पुढे ती गैरसोयीची ठरल्याने, कृष्णाखोरे महामंडळाची जागा ठरवली, त्या जागेची हस्तांतरणातील समस्येची सोडवणूक झाल्यावर, सातारचे क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय आरोग्य विभागाकडून, वैदयकीय शिक्षण विभागाकडे वर्ग करणे, डिन आणि अन्य स्टाफची नियुक्ती, शिक्षणासाठी तात्पुरत्या वर्ग आणि अनुषंगिक डिपार्टमेंटची व्यवस्था, त्यास मेडिकल कौन्सिलची मान्यता असा फार मोठा खडतर प्रवास झाला आहे. यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले आहे. परंतु, सुमारे 8-10 वर्षाचाकाळ देखिल गेला ही वस्तुस्थिती आहे.
वास्तविक गेल्या तीन-चार वर्षापूर्वीच प्रवेश प्रक्रीया व्हायला पाहीजे होते. तथापि, यंदाच्या वर्षी ती होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयामुळे विद्यार्थ्यांना 100 जागांची जादा संधी मिळणार आहे. त्याबरोबरच सातारच्या विकासाला नियोजनबध्द गती मिळणार आहे, व्यापार उदिमाला अधिक वेग मिळणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रीयेस आपण दिलेली मान्यता सातारकरांसह आम्हाला महत्वाची वाटते, असे स्पष्ट केले. महाविद्यालय सुरळीत सुरु होवून, या शासकीय महाविद्यालयामध्ये पदवीउत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमास देखिल वेळीच सुरु होण्याकरिता आपले यथोचित सहकार्य मिळावे, अशी विनंती देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी सौ. भारती पवार यांना केली.
दरम्यान, कोरोना बाबत अनेक समज-गैरसमज सामाजामध्ये आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपयायोजनांबरोबरच शास्त्रीय मिमांसा करणारे प्रबोधनात्मक संवाद आयोजित केले पाहिजेत. लोकांच्या मनात जी भीती बसली आहे, ती हटवण्यासाठी आणि अश्या स्वरुपाच्या भविष्यातील संसर्गजन्य रोगांचा सामना समर्थपणे आणि तारतम्याने करणारा समाज निर्माण करण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि संवादात्मक उपक्रम उपयुक्त ठरतील असेही मत व्यक्त केले.
कोरोनाने आपल्याला अनेक प्रकारांनी शिकवले आहे. लोप पावत चाललेली माणुसकी पुन्हा एकदा कात टाकत आहे. संकटे येतच असतात. परंतू, त्यास धीरोदत्तपणे तोंड देण्याची शक्ती देखिल कोरोनाने दिली आहे. आरोग्य यंत्रणा, स्वच्छता सेवकांसह सर्वाचे योगदान उल्लेखनीय आहे. आजपर्यंत आपल्यासाठी जगलो, आता समाजासाठी काही तरी केले पाहीजे, अशी भावना जवळजवळ सर्वच नागरीकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. माणसे निव्वळ भितीमुळेही दगावलेली आहेत. त्यामुळे मिळालेल्या अनुभवातून, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि त्याबाबतचे प्रबोधन याकरिता वेगवेगळे परिसंवाद, चर्चा सत्रे, ऑनलाईन किंवा शक्य असेल तेथे ऑफलाईन आयोजित करुन, अश्या स्वरुपांचे संसर्गजन्य आजारांचा समर्थपणे सामना कसा करायचा याबाबत माहिती खेडोपाड्यात देखिल पोहाचवली पाहीजे, अशी अपेक्षा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.