छत्रपती कृषी, औद्योगिक, वाहन महोत्सवाकडून इतरांनी बोध घ्यावा : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन; 19 रोजी भव्य डॉग शो चे आयोजन
आपला देश हा कृषीप्रधान आहे. अनेक देशांची अर्थव्यवस्था वेगवेगळ्या विषयांवर अवलंबून असते. मात्र, भारताची अर्थव्यवस्था कृषी वर अवलंबून आहे. त्यामुळे या देशातील शेतकरी सधन होण्याची गरज आहे. यासंबंधी मार्गदर्शन आणि माहिती घेण्यासाठीच छत्रपती कृषी, औद्योगिक, वाहन महोत्सवाकडून इतरांनी बोध घ्यावा, असे प्रतिपादन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
सातारा : आपला देश हा कृषीप्रधान आहे. अनेक देशांची अर्थव्यवस्था वेगवेगळ्या विषयांवर अवलंबून असते. मात्र, भारताची अर्थव्यवस्था कृषी वर अवलंबून आहे. त्यामुळे या देशातील शेतकरी सधन होण्याची गरज आहे. यासंबंधी मार्गदर्शन आणि माहिती घेण्यासाठीच छत्रपती कृषी, औद्योगिक, वाहन महोत्सवाकडून इतरांनी बोध घ्यावा, असे प्रतिपादन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
स्मार्ट एक्स्पो ग्रुप च्या व्यवस्थापन अंतर्गत व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले मित्र समूह, जय सोशल फौंडेशन यांच्यावतीने छत्रपती कृषी 2023 या भव्य राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक, वाहन व पशु-पक्षी प्रदर्शन 2023 चे स्मार्ट एक्सपो यांच्यावतीने आयोजित केलेल्या सातारा जिल्हा परिषद मैदानावरील छत्रपती कृषी औद्योगिक वाहन महोत्सवाचे उद्घाटन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
या छत्रपती महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ज्येष्ठ कृषी तज्ञ आणि कृषी क्षेत्रातील मार्गदर्शक डॉ. बुधाजीराव मुळीक, माजी जि. प. शिक्षण सभापती सुनील काटकर, स्मार्ट एक्सपो चे प्रमुख संयोजक सोमनाथ शेटे, जय सोशल फाउंडेशन चे सागर भोसले यांच्यासह जिल्हा कृषी अधीक्षक सौ.भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदास काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, कृषी विकास अधिकारी विजय माइणकर, प्रीतम कळसकर, शिवानी कळसकर, माजी नगराध्यक्षा सौ.रंजना रावत, सौ.रेखा शेटे, जितेंद्र खानविलकर, पंकज चव्हाण, संग्राम बर्गे, काका धुमाळ, विविध शेती तसेच पशु विभागाचे अधिकारी, जय सोशल फाउंडेशनचे क्रियाशील सदस्य, कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
तब्बल 250 हून अधिक नामवंत देशातील कंपन्यांच्या विक्री स्टॉल मध्ये असलेला सहभाग हा या महोत्सवाचे वैशिष्ट्य दर्शवतो.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खा. उदयनराजे म्हणाले, शेतकर्यांसाठी मी पुढे येत असताना डॉ.मुळीक साहेबांसारखा मार्गदर्शक या उद्घाटन सोहळ्यात सहभाग मार्गदर्शन करत आहेत, याचा विशेष आनंद वाटतो. डॉ.मुळीक साहेबांनी स्वतःची जीवनशैली शेतकर्यांसाठी वाहिली. आज छत्रपतींची आठवण आली तरी त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणा सर्वांना विचार दिला होता. आज हे प्रदर्शन खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण ठरणारे आहे. लोकशाहीची संकल्पना ही महाराज साहेबांचीच होती. लोकांचा सहभाग गरजेचा, हेच ध्येय धोरण आम्ही पुढे अंगीकारत आहोत. आज शेतकर्यांसाठी आपण झटत असताना देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटित झालेल्या आणि शेतकर्यांसाठी नव्या युगात खर्या अर्थाने मित्र ठरणार्या प्रभावी तंत्रज्ञानाची कमाल असलेला खते, औषधे स्प्रिंकलिंग करणारा स्वयंचलित ड्रोन या प्रदर्शन महोत्सवाचे आकर्षण आहे. हे प्रदर्शन पाहिल्यावर शेतकर्यांमध्ये शेतीविषयी नवीन चेतना निर्माण होईल, याचा विशेष आनंद होत आहे. हे प्रदर्शन आपणा सर्वांसाठी खरोखरच मार्गदर्शक ठरेल व यातून आपल्याला नवनवीन विकास आणि तंत्रज्ञानाची ओळख होईल.
उद्घाटन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांना प्रदर्शन करताना कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक म्हणाले, सातार्यात खासदार उदयनराजे यांच्या मार्गदर्शनाखाली भरलेले हे प्रदर्शन आता देश पातळीवर जाणे गरजेचे आहे. आजवर अनेक कृषी प्रदर्शनात मी सहभागी झालो होतो. मात्र हे प्रदर्शन खर्या अर्थाने आगळे वेगळे आणि संयोजनाचा एक आदर्श असे उदाहरण आहे. सध्या शेतकर्यांना भीतीदायक ठरणारा लम्पी रोग सातार्यात मात्र कमी आहे. अशी प्रदर्शने खर्या अर्थाने मार्गदर्शनाचा केंद्रबिंदू असून हे प्रदर्शन भविष्यात खरोखरच देश स्तरावर मार्गदर्शनाचा एक टप्पा ठरेल असे वाटते. आता तुम्ही सर्वांनी जागृत होणे गरजेचे आहे. सातत्याने सर्वांनी न थांबता पुढे जरुरीचे आहे महाराज साहेबांबरोबर आपल्या सर्वांची साथ यासाठी महत्त्वाची आणि मोलाची आहे. राजे साहेबांना खर्या अर्थाने आता कृषी मंत्री करणे आपणा सर्वांची जबाबदारी आहे.
संयोजक सोमनाथ शेटे, रेखा शेटे व हेमलता भोसले यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मोरे यांनी केले.
छत्रपती कृषी महोत्सवामध्ये शेतकरी आणि सर्वसामान्य कुटूंबातील व्यक्तीसाठी उपयुक्त असे साहित्य विविध स्टॉल्समध्ये विक्रीस ठेवण्यात आले आहे. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील दीड टन वजनाचा गजेंद्र हा सहा वर्षाचा रेडा या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.
दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळा देशी विदेशी जातीच्या नामवंत श्वानांच्या करिता श्वानप्रेमींकडून स्पेशल डॉग शोचे आयोजन करण्यात आलेले आहे.