खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य
पुढील सप्ताहामध्ये छत्रपती उदयनराजे मित्र समुहाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन
आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुढील सप्ताहामध्ये छत्रपती उदयनराजे मित्र समुहाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
सातारा : आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुढील सप्ताहामध्ये छत्रपती उदयनराजे मित्र समुहाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या सोहळ्यानिमित्त विविध ठिकाणी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा सोमवार दि.२० फेब्रूवारी पासून सुरु होणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने सातारा जिल्हा परिषदचे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती सुनिल काटकर यांनी दिली. दि.२१/०२/२३ रोजी संध्या ७.०० वाजता बास्केट बॉल स्पर्धा बक्षीस वितरण शिर्के शाळा मैदान सातारा, दि.२१/०२/२३ नेत्र चिकित्सा शिबीर, आकाशवाणी सातारा, दि.२१/०२/२३ नेत्र चिकित्सा शिबीर बस स्टॅण्ड सातारा, दि.२१/०२/२३ फॅशन आयकॉन ऑफ सातारा २०२३ गांधी मैदान, राजवाडा सातारा, दि.२२/०२/२३ श्री.छ.उदयनराजे भोसले शरीर सौष्ठव स्पर्धा, गांधी मैदान, राजवाडा सातारा, दि.२३/०२/२३ संध्या ७¬.०० वाजता इंडियन आयडॉल फेम रोहित राऊत, जुईली जोगळेकर गाण्यांचा कार्यक्रम, गांधी मैदान, राजवाडा सातारा, दि.२३/०२/२३ नेत्र चिकित्सा शिबीर, चिंचणेर वंदन, दि.२३/०२/२३ भुमाता युथ फाऊंडेशन भव्य शस्त्रक्रिया सप्ताह, माऊली हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर देगांव फाटा, दि.२३/०२/२३ रक्तदान शिबीर, जाखिणवाडी रोड, बचपन शाळेशेजारी, ता.कराड, दि.२३/०२/२३ संध्या ०९.०० वाजता दादा महाराज चषक क्रिकेट स्पर्धा अंतिम सामना व बक्षिस वितरण समारंभ, शाहू स्टेडियम, सातारा, दि.२४/०२/२३ रिमांड होम, एहसास, पुरुष भिक्षेकरी गृह, जकातवाडी आश्रमशाळा जेवण, सातारा शहर, दि.२४/०२/२३ सकाळी ९.०० वाजता उसाच्या रसाचे वाटप, सातारा शहर, दि.२४/०२/२३ सिव्हिल हॉस्पिटल रुग्णांना अन्नदान, सिव्हिल हॉस्पिटल, सातारा, दि.२४/०२/२३ महानुभव मठ फळवाटप, तामजाईनगर सातारा, दि.२४/०२/२३ संध्या ६.०० वाजता, जल्लोश महाराष्ट्र डान्स चॅम्पियनशिप, हेड पोस्ट ऑफिस शेजारी शनिवार पेठ, कराड, दि.२४/०२/२३ रिक्षा स्टॉप उद्घाटन, कनिष्क मंगल कार्यालयाशेजारी, दि.२४/०२/२३ रिमांड होम, अन्नदान व शालेय वस्तू वाटप, सातारा शहर, दि.२५/०२/२३ डॉग शो, गोडोली, सातारा, दि.२५/०२/२३ संध्या ४.०० वाजता, नटखट बाल नृत्य स्पर्धा (३ ते ६ वर्षापर्यंत), पेरेंन्टस स्कूल मैदान, गोडोली सातारा, दि.०१/०३/२३ बैलगाडी शर्यत छत्रपती चषक, हजारमाची ओगलेवाडी ता.कराड.
या सर्व कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन छत्रपती उदयनराजे मित्र समुहाच्यावतीने करण्यात आले आहे.


