उदयनराजेंना विक्रमी मतदाधिक्क्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार
मनसे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांचा निर्धार; उदयनराजेंच्या रॅलीमध्ये मनसैनिकांचा हजारोंच्या संख्येने सहभाग
सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीमधील भाजप चे अधिकृत उमेदवार श्री.छ. उदयनराजे भोसले यांना राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक विक्रमी मतदाधिक्क्याने निवडून आणण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी केला आहे.
सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीमधील भाजप चे अधिकृत उमेदवार श्री.छ. उदयनराजे भोसले यांना राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक विक्रमी मतदाधिक्क्याने निवडून आणण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिल्यानंतर महायुतीला प्रचंड मोठी ताकद मिळाली आहे. महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मनसे कटिबद्ध असल्याचेही राजसाहेब ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आणि सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीमधील भाजप चे अधिकृत उमेदवार श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी दि. 18 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी उदयनराजे यांच्या समर्थकांनी भव्य रॅलीचे आयोजन केले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी सातारा जिल्ह्यातील तमाम मनसैनिकांना रॅलीत सहभागी होण्यास सांगितले होते.
त्यानुसार दि. 18 रोजी जिल्ह्यातील कानाकोपर्यातून मनसैनिकांचे जथ्थे सातार्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी हजारोंच्या संख्येने सातारा शहरातून दुचाकी रॅली काढून उदयनराजेंना पाठींबा दर्शविला. या दुचाकी रॅलीचे सातारकरांनी कौतुक केले. यानंतर सकाळी मनसे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी उदयनराजेंची भेट घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठींबा असल्याचे सांगितले. त्यांच्या या पाठिंब्याबाबत उदयनराजे यांनी युवराज पवार यांचे आभार मानले आहेत.
याप्रसंगी बोलताना युवराज पवार म्हणाले, शिवछत्रपतींचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांना तमाम मनसैनिकांनी पाठिंबा दर्शवला असून उदयनराजेंना राज्यातच नव्हे तर देशात विक्रमी मताधिक्क्याने निवडून देवू. यासाठी सर्वतोपरी माझ्यासह जिल्ह्यातील मनसैनिक प्रयत्न करतील. उदयनराजेंनी सातार्यासाठी दिलेले योगदान अभूतपूर्व आहे. सातारा जिल्ह्यातील विकासकामांसाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून ती कामे पूर्णत्वास नेली आहेत. त्यामुळे अबालवृद्धांसह तरुणाईचा त्यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. उदयनराजेंच्या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले मनसैनिक फक्त आणि फक्त उदयनराजेंना विक्रमी मताधिक्क्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या रॅलीला झालेली गर्दी पाहून उदयनराजे यांचा विजय निश्चितच असल्याचेही त्यांनी सांगितले.