maharashtra

मला परवडत नाही म्हणून मी दुचाकीवरून गेलो : खा. उदयनराजे


I couldn’t afford it so I got off the bike: eat. Udayan Raje
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात दुचाकीवरून जाऊन विकास कामांचे उद्घाटन केले होते. त्यावर आमदार शिवेंद्रराजे यांनी टोला लगावत नगरपालिका नीट चालवली असती तर दुचाकी चालवायची वेळ आली नसती, असे म्हंटले होते. यावर उदयनराजे यांनी आज किल्ले प्रतापगड येथे त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले.

सातारा : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात दुचाकीवरून जाऊन विकास कामांचे उद्घाटन केले होते. त्यावर आमदार शिवेंद्रराजे यांनी टोला लगावत नगरपालिका नीट चालवली असती तर दुचाकी चालवायची वेळ आली नसती, असे म्हंटले होते. यावर उदयनराजे यांनी आज किल्ले प्रतापगड येथे त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले.
उदयनराजे म्हणाले, मला परवडत नाही म्हणून मी दुचाकीवरून गेलो, मी चालत ही जाईन, रांगत ही जाईन, वाटले तर लोळत ही जाईन. नाहीतर लोटांगण घालत ही जाईन. एवढेच काय गडगडत ही जाईल, सीट वर उभा राहून जाईल नाहीतर डोक्यावर चालत जाईन, तुम्हाला काय करायचेय? अशा भाषेत शिवेंद्रराजे यांना उत्तर दिल्याने राजेंमधील नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.