maharashtra

खासदार उदयनराजे भोसले यांनी लुटला पुष्पा चित्रपटाचा आनंद

राजलक्ष्मी थिएटरमध्ये राजेंचा हटके अंदाज

साताऱ्यात भाजपचे खासदार ‘उदयनराजे भोसलेंचा’ अंदाज नेहमी हटके असतो. ते कधी काय करतील याचा कोणालाच अंदाज लागत नाही. राजकीय परिणामांची भीती न बाळगता त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे यापूर्वी राज्यात धुरळा उडवून दिला होता. मजबूत शरीरयष्टी, भेदक नजर, तडकाफडकी जागेवर निकाल लावण्याच्या त्यांच्या वृत्तीचा साताऱ्यातच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात बोलबाला असतो.

सातारा : साताऱ्यात भाजपचे खासदार ‘उदयनराजे भोसलेंचा’ अंदाज नेहमी हटके असतो. ते कधी काय करतील याचा कोणालाच अंदाज लागत नाही. राजकीय परिणामांची भीती न बाळगता त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे यापूर्वी राज्यात धुरळा उडवून दिला होता. मजबूत शरीरयष्टी, भेदक नजर, तडकाफडकी जागेवर निकाल लावण्याच्या त्यांच्या वृत्तीचा साताऱ्यातच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात बोलबाला असतो.
युवकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या उदयनराजेंनी उगारलेलं बोट, उडविलेली कॉलर, काय बाई सांगू कसं गं सांगू… हे म्हणलेलं गाणं, त्यांची 007 क्रमांकाच्या जिप्सीचं नेहमी सर्वांना आकर्षण असतं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा साताऱ्यात पाहायला मिळाला आहे.
नुकतंच उदयनराजे यांनी साताऱ्यातील राजलक्ष्मी थिएटरमध्ये आपल्या मित्रांसोबत जावून सुपरस्टार ‘अल्लू अर्जुन’चा बहुचर्चित ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट एन्जाॅय केलाय.
सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. थिएटरमध्ये जावून फिल्म पाहण्याची उदयनराजेंची ही पहिलीच वेळी नाहीय, तर याआधी देखील त्यांनी बरेच चित्रपट थिएटरमध्ये जावून पाहिले आहेत.