राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरु होते, असे वक्तव्य करून शिवप्रेमींच्या तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांनी आपले वक्तव्य करीत मागे घ्यावे, असे ट्विट खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले. मात्र काही वेळातच उदयनराजे यांनी ट्विट डिलीट करून दुसरे ट्विट करून राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आज दिवसभर राजकीय वर्तुळात उदयनराजे भोसले यांनी डिलिट केलेल्या ट्विटची चर्चा जोरात सुरू होती.
सातारा : राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरु होते, असे वक्तव्य करून शिवप्रेमींच्या तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांनी आपले वक्तव्य करीत मागे घ्यावे, असे ट्विट खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले. मात्र काही वेळातच उदयनराजे यांनी ट्विट डिलीट करून दुसरे ट्विट करून राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आज दिवसभर राजकीय वर्तुळात उदयनराजे भोसले यांनी डिलिट केलेल्या ट्विटची चर्चा जोरात सुरू होती.
औरंगाबाद येथे बोलताना राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल यांनी केले आहे. त्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असतानाच उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत राज्यपाल यांच्या विधानाचा समाचार घेतला होता. राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु होत्या. मात्र राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यामुळे तमाम शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, असे ट्विट त्यांनी केले होते. मात्र काही वेळातच ते डिलीट करून राज्यपालांनी माफी मागावी, असे नवीन ट्विट केले.
दरम्यान प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व संतांविषयी आदर होता. मावळ्यांच्या सहकार्याने आणि स्वतःच्या कर्तुत्वावर ते मोठे झाले. राज्यपाल सारख्या मोठ्या पदावर असणार्या व्यक्तींनी शब्दांचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. शब्द हे शस्त्र आहे. इतिहास कधीच कोणी बदलू शकत नाही, त्यामुळे राज्यपालांनी इतिहास वाचावा.


