पुण्यातील संततधार पाऊस आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे, भारतीय सैन्यदलाने एकता नगरमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एक पूरग्रस्त मदत तुकडी त्वरीत तैनात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने आज सकाळी 9:15 वाजता भारतीय लष्कराच्या सहाय्याची मागणी केल्यानंतर त्वरीत ही कार्यवाही करण्यात आली. पूरग्रस्त भागात तैनात केलेल्या या तुकडीत सुमारे 100 जवानांचा समावेश आह...
पुणे शहर परिसरात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आज पुणे शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
केंद्रीय अल्पसंख्यांक राज्यमंत्री जॉन बार्ला आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर
पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैशाची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे. या सगळ्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
Pune Girl Attack: लेशपाल आणि हर्षद मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजता सदाशिव पेठेतील विद्यानिकेतन या अभ्यासिकेत जात होते. ही सकाळ त्यांच्यासाठी नेहमीसारखीच होती. 'वाचवा, वाचवा,' अशी आरोळी ऐकू आल्याने ते सावध झाले, वाचा पुढे काय घडलं पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे अधिकारी होऊन कर्तव्य बजावण्याचे ध्येय उराशी बाळगून पुण्यात आलेले लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांचा मंगळवारचा दिव...
मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी आता ड्रेस कोड असणार आहे. पुणे उपनगरातील मंदिर ट्रस्टने ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत नागरिकांनी अन् भाविकांनी केले आहे.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाचं सत्र सुरुच आहे. आजही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला आहे. तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली आहे.
आमिर खान यांनी पानी फाऊंडेशनची कल्पना मांडली. इतकेच नव्हे तर पाणी फाऊंडेशनने सातत्य दाखवत जलसंधारण अणि शेतकऱ्यांना समर्थ करण्याचे कार्य केले आहे.
माण-खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल येथे उपचार सुरु आहे. गोरे यांच्यासह 4 जण त्या गाडीतून प्रवास करत होते.
सातारा ते मुंबई महामार्गावरील नर्हे स्मशानभूमीच्या वरील बाजूला असलेल्या भूमकर पुलाजवळ एका ट्रेलरने उतारावर ४७ वाहनांना जोरदार धडक दिली असून त्यामुळे संपूर्ण परिसरात एकाच हाहाकार उडाला.
सांगली जिल्ह्यातील सलगरे गावचा मूळ राहिवासी व नोकरीनिमित्ताने पुण्यात कार्यरत असलेल्या मोहन महादेव हारगे या प्राथमिक शिक्षकाने आर्थिक फसवणूक केल्याचा तसेच मुलीसह आपले अपहरण केल्याचा आरोप करून कराड तालुक्यातील शुभांगी शेळके या दिव्यांग महिलेने या प्रश्न न्याय मिळावा, म्हणून साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' हा बहुचर्चित कार्यक्रम येत्या ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत असते. कोण होणार करोडपती या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो.
पुणे जिल्ह्यातील विहम (ता. खेड) येथे आढळून आलेली १५ ते १८ व्या शतकातील तांब्याची १४७ नानी पुणे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने यांच्याकडून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे सुपुर्द करण्यात आली.
एकीकडे पेट्रोल व डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत तर दुचाकी, चारचाकी ई-वाहनांसाठी खरेदीमध्ये मोठी सवलत मिळत असून इलेक्ट्रिक चार्जिंगद्वारे स्वस्त इंधन देखील उपलब्ध होत आहे. त्यामुळे ई-वाहनांचा वापर ही काळाची गरज झाली आहे, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले.
एकामागोमाग एक झालेल्या सिलेंडर स्फोटांनी पुणे हादरलं. पुण्यातल्या कात्रजमधल्या गंधर्व लॉन्सजवळ सिलेंडरचे भीषण स्फोट झाले. गोडाऊनमध्ये सिलेंडरचा साठा करण्यात आला होता. गोडाऊनाला अचानक लागलेल्या आगीत सिलेंडरचा एकामागोमाग एक स्फोट झाले.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागेवाडी फाटा येथे पिकअप वाहनाला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरून अन्य एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी फोर्ड वाहनचालक सुरज सुभाष देसाई, रा. कर्मवीर सोसायटी, सेनापती बापट रोड, पुणे यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे तत्पर व धाडसी तसेच तातडीने मदतीला धावून जाणारे मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. मग तो प्रसंग कोणताही असो. अडचणीच्या काळी ना.शंभूराज देसाई हे मदतीला नेहमी धावून जातात याचा अनेकदा प्रत्यय आला असून असाच अपघाताचा प्रसंग काल मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली येथे घडला.
पुणे- बंगळूर महामार्गावर सातारा शहराजवळ शेंद्रे गावाच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
कुलमुखत्यारपत्र करून दिलेल्या जमीनमालक व्यक्तीचा मृत्यू झाल्यावरही तो जिवंत असल्याचे दाखवून जागा नावावर करून बळकावल्याच्या प्रकरणात प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पुनम सिन्हा, पुत्र कुश सिन्हा यांच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाणे व सक्तवसुली संचालनालय येथे संदीप दाभाडे यांनी डिसेंबर २०२१ मध्ये तक्रारी केल्या होत्या.
पोलीस कर्मचाऱ्यानेच रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दत्तवाडी पोलिसांनी कट रचून खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका गुन्हेगाराला अटक केली आहे.
कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ ऐतिहासिक असून पर्यटन स्थळ म्हणून नव्हे तर शूरवीरांना अभिवादन करण्याचे स्थळ म्हणून विकसित करण्यात येईल, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण केले.
दुबईस्थित अल अदील समूहाचे संचालक हृषिकेश दातार पुण्याचे जावई बनले आहेत. हृषिकेश हे अल अदील समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांचे ज्येष्ठ सुपुत्र असून त्यांची लग्नगाठ पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक-व्यावसायिक समीर लडकत यांची कन्या आकांक्षा हिच्याशी जुळली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आज गुरुवारी १६ रोजी 39 वा दिवस असून कराड आगाराचे आजअखेर सुमारे ३ कोटी १२ लाखांचे नुकसान आहे. बुधवारी १५ रोजी ढेबेवाडी, कोल्हापूर, पुणे मार्गावर कराड आगारातील बसेस धावल्या असून बसच्या दिवसात 24 फेऱ्या झाल्या असल्याची माहिती कराडचे प्रभारी आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी दिली.
नेत्रोपचार करणाऱ्या दवाखान्यांना 'डे केअर सेंटर' म्हणून नोंदणीची मान्यता मिळण्यासाठी सध्याच्या कायद्यात सरकार बदल करेल, असे आश्वासन राजेश टोपे यांनी दिले.
सातारा जिल्ह्यातून तब्बल 22 दिवसानंतर पहिली लालपरी आज मंगळवारी दि. 30 रोजी पोलीस बंदोबस्तात स्वारगेटकडे रवाना झाली. शिवशाही बस नंतर लालपरी बस आता सातारा- स्वारगेट सुरू झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. याच बरोबर सातारा- सातारारोड ही बस सुद्धा ग्रामीण भागात पहिली बस सुरू करण्यात असून 14 कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक रेश्मा गाडेकर यांनी दिली.
आळंदी येथील संजीवन समाधी सोहळ्यासाठी येत असलेल्या पायी पालखीच्या दिंडीत एक टेम्पो घुसल्याने झालेल्या अपघातात 30 वारकरी जखमी झाले. ही घटना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील मावळ तालुक्यातील साते फाटा येथे आज (दि.२७) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन महिला वारकर्यांचा मृत्यु झाला आहे. तर 30 जण जखमी झाले आहेत.
16 फेब्रुवारी 2019 रोजी नाईकनवरे याने एकाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. नाईकनवरे व त्याच्या साथीदारांवर चोरी, रॉबरी व मारामारीचे गुन्हे दाखल होते. तो आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का अर्तगत कारवाई करण्यात आली होती. अत्यंत सराईत गुन्हेगार हा गेल्या दोन वर्षापासून फरार होता.
मुंबई- बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. एका कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील दुभाजकाला धडकून कंटेनर पलटी झाला.
वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रच्या शिवराज राक्षेने उत्तर भारतीय मल्लांचे तगडे आव्हान मोडून काढीत खुल्या गटात सुवर्णपदक मिळवले. फ्रीस्टाईल प्रकारात पुरुष व महिला मल्लानी दोन रौप्य आणि सात कास्य ग्रीकोरोमनमध्ये देखील तीन कास्यपदकासह महाराष्ट्राच्या संघाने दहा कास्यपदकाची कमाई करीत घवघवीत यश प्राप्त केले.
पुणे- बंगलोर महामार्गावर भुयाचीवाडी येथे उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून आलेल्या इनोव्हा कारने जोराची धडक दिली. या धडकेत दोन महिला जागीच ठार झाल्या असून अन्य चारजण जखमी झाले आहेत.
आमदार संग्राम थोपटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.
शहरातून जाणाऱ्या पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर रविवारी ७ रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर पुण्या-मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची त्यामुळे चांगलीच दैना उडाल्याचे चित्र दिसून आले.
गणपती बाप्पा मोरया... च्या जयघोषात आणि सनईच्या स्वरात गुरुवारी पुन्हा एकदा दगडूशेठ गणपती मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले. शासन आदेशानुसार घटस्थापनेच्या दिवशी मंदिरे खुली झाल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
सातारा : आपल्या सीएसआर कटिबद्धतेचा भाग म्हणून सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाने (एसपीएन) वृक्षारोपण प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी स्वयंसेवी संस्था सेट्रीज सोबत सहयोग केला आहे. एसपीएन व सेट्रीज यांनी सहयोगाने महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त सातारा जिल्ह्यामधील तीन एकर जमिनीवर घनदाट वनीकरणाच्या माध्यमातून ८००० हून अधिक विविध रोपट्यांच्या स्थानिक प्र...
फलटण : ‘दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी पाहिलेले फलटणच्या रेल्वेचे स्वप्न त्यांचे सुपुत्र खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पूर्ण केले असून, फलटण-पुणे रेल्वे सुरू झाल्यामुळे या भागाच्या विकासाला आणि प्रगतीला हातभार लागणार आहे. रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी खा. रणजितसिंह यांनी केलेले प्रयत्न अभिमानास्पद आहेत,’ असे मत केंद्रीय पर्यावरण, वन, माहिती आणि प्रसारण म...
‘ग्रामीण भागासाठी फेरोसिमेंट तंत्रज्ञान उपयुक्त असून, त्याचा वापर वाढल्यास ग्रामीण तरुणांना व्यवसाय उपलब्ध होऊ शकेल. याशिवाय ग्रामीण महिलांना गावातच रोजगारही उपलब्ध होऊ शकेल,’ असे मत महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव (लाभ क्षेत्र विकास) राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्यासाठी पावले टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्याच्या यंत्रणेला देखील त्यांनी निर्देश दिले आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून अजित पवार यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेतली आहे. तातडीची वैद्यकीय मदत व अन्य साह्य करण्याच्या सूचन
लसीकरणासाठी पहिल्या गटात सरकारी आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवरील कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे.
कराड : विधान परिषदेच्या लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव निश्चित केला. लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली. देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली. शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास लाड यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. प्रचारात ...
पुणे : डिसेंबर पर्यंत लस मिळेल अशी माहिती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी माहिती दिलीय. चार महिने आपल्याला असेच काढावे लागतील. लस काही एकाच वेळेला सर्वांना मिळेल असेही नाही. त्यामुळे मास्क आणि हात धुणे ही सध्याची लस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मुंबईनंतर आता पुण्यातही आता जम्बो कोव्हीड सेंटर उभारण्यात आले आहे. पुण्यातील पहिले जम्बो हॉस्पिटलचं उद्घाटन मुख्यमं...