पुण्यात कार्यरत सांगलीच्या शिक्षकाकडून अपहरण व आर्थिक फसवणूक
सातारा जिल्ह्यातील दिव्यांग महिलेचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
सांगली जिल्ह्यातील सलगरे गावचा मूळ राहिवासी व नोकरीनिमित्ताने पुण्यात कार्यरत असलेल्या मोहन महादेव हारगे या प्राथमिक शिक्षकाने आर्थिक फसवणूक केल्याचा तसेच मुलीसह आपले अपहरण केल्याचा आरोप करून कराड तालुक्यातील शुभांगी शेळके या दिव्यांग महिलेने या प्रश्न न्याय मिळावा, म्हणून साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.
सातारा : सांगली जिल्ह्यातील सलगरे गावचा मूळ राहिवासी व नोकरीनिमित्ताने पुण्यात कार्यरत असलेल्या मोहन महादेव हारगे या प्राथमिक शिक्षकाने आर्थिक फसवणूक केल्याचा तसेच मुलीसह आपले अपहरण केल्याचा आरोप करून कराड तालुक्यातील शुभांगी शेळके या दिव्यांग महिलेने या प्रश्न न्याय मिळावा, म्हणून साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.
या निवेदनात शुभांगी शेळके यांनी म्हटले आहे की, विजयनगर (ता. कराड) येथे एक अज्ञान मुलगी व मुलासह आपण राहत असून नोकरीच्या शोधात असताना सलगरे येथील मोहन हारगे या प्राथमिक शिक्षकाशी ओळख झाली. त्यांच्या अध्यक्षतेखालील लक्ष्मी पतसंस्था व ओम फायनान्स या दोन ठिकाणी काम मिळवून देतो, असे आमिष त्यांनी दाखवले. तसेच संबंधित महिलेचे चेकबुक, एटीएम कार्ड तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड आदी मूळ कागदपत्रे ताब्यात घेतली. कर्ज करून देतो, असे आमिष दाखवत संबंधित शिक्षकाने अनेकांकडून एक लाखापासून पन्नास लाखांपर्यंत रकमा उचलले आहेत.
त्यासाठी शुभांगी शेळके यांच्या बँक खात्याचा विनापरवाना गैरवापर केल्याचाही आरोप शुभांगी शेळके यांनी या निवेदनात केला आहे. याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन जीवे मारण्याची धमकीही त्याने दिल्याचे शेळके यांनी निवेदनात म्हटले आहे. मात्र त्यास न जुमानता शेळके ह्या पोलिस व प्रशासनाकडे धाव घेणार असल्याचे लक्षात येतात मोहन हारगे यांनी पुणे, कात्रज, कराड, सांगली आदी ठिकाणच्या पोलीस दलामध्ये खोट्या तक्रारींची निवेदने दिली आहेत, असेही सौ. शेळके यांनी म्हटले आहे.


