पुनम शत्रुघ्न सिन्हा, कुश सिन्हा यांच्याविरोधात कारवाई
बंडगार्डन पोलिस स्टेशनचे तक्रारदारास उत्तर; जमीनमालकाच्या मृत्यूनंतर कुलमुखत्यार पत्राचा वापर करून जागा बळकावण्याचे प्रकरण
कुलमुखत्यारपत्र करून दिलेल्या जमीनमालक व्यक्तीचा मृत्यू झाल्यावरही तो जिवंत असल्याचे दाखवून जागा नावावर करून बळकावल्याच्या प्रकरणात प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पुनम सिन्हा, पुत्र कुश सिन्हा यांच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाणे व सक्तवसुली संचालनालय येथे संदीप दाभाडे यांनी डिसेंबर २०२१ मध्ये तक्रारी केल्या होत्या.
पुणे : कुलमुखत्यारपत्र करून दिलेल्या जमीनमालक व्यक्तीचा मृत्यू झाल्यावरही तो जिवंत असल्याचे दाखवून जागा नावावर करून बळकावल्याच्या प्रकरणात प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पुनम सिन्हा, पुत्र कुश सिन्हा यांच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाणे व सक्तवसुली संचालनालय येथे संदीप दाभाडे यांनी डिसेंबर २०२१ मध्ये तक्रारी केल्या होत्या.
पूनम शत्रुघ्न सिन्हा, कुश सिन्हा यांच्याविरोधात कारवाई आता जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक यांच्या कक्षेत असून कारवाईचे अधिकार त्यांच्याकडे असल्याने तिकडे पाठपुरावा करावा, असे लेखी उत्तर बंडगार्डन पोलिस स्टेशनने तक्रारदार संदीप दाभाडे यांना दिले आहे. पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार यांचे हे उत्तर मिळाल्यावर तक्रारदार संदीप दाभाडे यांनी जिल्हाधिकारी पुणे आणि दुय्यम निबंधक यांच्याकडे 28 डिसेंबर २०२१ रोजी नव्याने तक्रार दिली आहे.
मौजे वाघोली (तालुका हवेली ,जिल्हा पुणे) येथील जमीन (गट क्रमांक १३३१/१ क्षेत्र १ हेक्टर आणि ५५ आर) स्वतः व साथीदार यांचे नावावर करुन बळकाविल्याची सिन्हा कुटुंबीय आणि त्यांच्या साथीदारांविरूद्ध ही तक्रार आहे. ही जागा सिन्हा कुटुंबीयांनी मर्सिडिझ कंपनी शोरुमला भाडयाने दिली आहे.
यात पोलिसात दिलेल्या तक्रारीवर पोलीस स्टेशन बंडगार्डन यांचे जावक क्र. 9154/2021 दि. 23.12.2021 याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार यांनी तक्रारदार संदीप दाभाडे यांना पोस्टाने पाठविलेले समजपत्र प्राप्त झाले आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक , महाराष्ट्र राज्य , पुणे यांनी क्र. का 4/ प्र. क्र. 621 /2013 /2806 यांनी दि. 30.11.2013 अन्वये जारी केलेल्या परिपत्रक प्रमाणे नोंदणी कायदा अधिनियम चे कलम 82 अंतर्गत सबंधित सह दुय्यम निबंधक कार्यालयाने जिल्हा निबंधक (जिल्हाधिकारी) यांचे स्तरावर प्रकरण सदर करून पुढील फौजदारी कारवाई करावी असा संदर्भ नमूद केला आहे .
करीता याबाबत दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक 11 यांनी 27.12.2021 दि. आणि पूर्वीच दि. 15.11.2021, 15.11.2021 व रोजी नोंदणी कायदा अधिनियम कलम 82 तसेच भारतीय दंड संहिता चे कलम 120 - ब, 200, 417, 419, 467, 468 प्रमाणे कारवाई करीता तक्रार संदीप दाभाडे यांनी सादर केल्या आहेत.
जिल्हा निबंधक (जिल्हाधिकारी) पुणे व सह जिल्हा निबंधक (मुद्रांक जिल्हाधिकारी) पुणे यांना दि. 28.12.2021 रोजी तक्रार सादर करून दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्रमांक 11 यांना सत्वर कारवाई करणे याबाबत आदेशित होण्याची विनंती तक्रारदार संदीप दाभाडे यांनी केली आहे. ही माहिती तक्रारकर्ते संदीप दाभाडे यांनी पत्रकाद्वारे पुण्यात दिली.


