maharashtra
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात; 11 गाड्यांची एकमेकांना धडक, मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली
पुणे-मुंबई महामार्गावर अपघात
![Strange accident on Pune-Mumbai expressway; 11 cars collided with each other, traffic towards Mumbai was disrupted](https://esahas.com/upload/post/f5b2828fc4.jpg)
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाचं सत्र सुरुच आहे. आजही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला आहे. तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली आहे.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाचं सत्र सुरुच आहे. आजही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला आहे. तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.