maharashtra

नागेवाडी फाट्याजवळील अपघातप्रकरणी पुणे येथील एकावर गुन्हा


Crime against one in Pune in accident case near Nagewadi fork
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागेवाडी फाटा येथे पिकअप वाहनाला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरून अन्य एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी फोर्ड वाहनचालक सुरज सुभाष देसाई, रा. कर्मवीर सोसायटी, सेनापती बापट रोड, पुणे यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागेवाडी फाटा येथे पिकअप वाहनाला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरून अन्य एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी फोर्ड वाहनचालक सुरज सुभाष देसाई, रा. कर्मवीर सोसायटी, सेनापती बापट रोड, पुणे यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १६ रोजी ४ वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागेवाडी फाटा, ता. सातारा गावच्या हद्दीत पिकअप वाहन पंक्चर झाल्यामुळे त्या वाहनाचा पंक्‍चर काढत असताना फोर्ड गाडी चालक सुरज देसाई याने पिकअप वाहनाला फोर्ड गाडीने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात समाधान मोहन कांबळे, रा. उमरगा, जि. लातूर याच्या मृत्यूस कारणीभूत ठरून अन्य एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.