maharashtra

पुणे बंगलोर महामार्गावर उभ्या मालट्रकला इनोव्हाची धडक : दोन महिला ठार, चार जखमी


Innova hits a truck on Pune-Bangalore highway, killing two women and injuring four
पुणे- बंगलोर महामार्गावर भुयाचीवाडी येथे उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून आलेल्या इनोव्हा कारने जोराची धडक दिली. या धडकेत दोन महिला जागीच ठार झाल्या असून अन्य चारजण जखमी झाले आहेत.

कराड : पुणे- बंगलोर महामार्गावर भुयाचीवाडी येथे उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून आलेल्या इनोव्हा कारने जोराची धडक दिली. या धडकेत दोन महिला जागीच ठार झाल्या असून अन्य चारजण जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कल्याण- ठाणे येथून कोल्हापूला निघालेली एक इनोव्हा गाडी क्रमांक (MH- 05- EA- 2642) आणि भुयाचीवाडी येथे राजपुरोहित ढाबा येथे उभा असलेला ट्रक क्रमांक (MH- 12- DT- 0779) याचा अपघात झाला. गुरूवारी दि. 11 रोजी सकाळी 7 ते 7.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. राजपुरोहित ढाबा येथे ट्रकचालक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून बाथरूमला गेला होता. यावेळी साताराकडून कोल्हापूरच्या दिशेला निघालेल्या इनोव्हा गाडीने पाठीमागून जोराची धडक दिली.
या गाडीत सहाजण होते. त्यातील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चारजण जखमी झाले आहेत. उंब्रज पोलिसांनी घटनास्थळांचा पंचनामा केला आहे. जखमींना उपचारासाठी कराड येथील सह्याद्री हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील लोक हे कल्याण- ठाणे येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे.