maharashtra

नवले पुलाजवळ भीषण अपघात

चालक जखमी : कंटेनरच्या केबिनचा चुराडा

Terrible accident near Navale bridge
मुंबई- बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. एका कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील दुभाजकाला धडकून कंटेनर पलटी झाला.

पूणे : मुंबई- बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले पुल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. एका कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील दुभाजकाला धडकून कंटेनर पलटी झाला. यामध्ये चालक जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, साताराकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनर नवले पुल परिसरात आल्यानंतर कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि महामार्गावरील रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकाला धडकून कंटेनर पलटी झाला. अपघात एवढा भीषण होता की, चालकाच्या केबिनचा अक्षरशः चुराडा झाला. यामध्ये चालक जखमी झाला असून त्याला जवळच्या मोरया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शिंगाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने पोहचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी चालकाला बाहेर काढले. क्रेन च्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन काढण्याचे काम सुरू असून महामार्गावर वाहनांच्या रांगा लांबवर लागलेल्या आहेत.