आळंदी येथील संजीवन समाधी सोहळ्यासाठी येत असलेल्या पायी पालखीच्या दिंडीत एक टेम्पो घुसल्याने झालेल्या अपघातात 30 वारकरी जखमी झाले. ही घटना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील मावळ तालुक्यातील साते फाटा येथे आज (दि.२७) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन महिला वारकर्यांचा मृत्यु झाला आहे. तर 30 जण जखमी झाले आहेत.
पुणे : आळंदी येथील संजीवन समाधी सोहळ्यासाठी येत असलेल्या पायी पालखीच्या दिंडीत एक टेम्पो घुसल्याने झालेल्या अपघातात 30 वारकरी जखमी झाले. ही घटना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील मावळ तालुक्यातील साते फाटा येथे आज (दि.२७) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन महिला वारकर्यांचा मृत्यु झाला आहे. तर 30 जण जखमी झाले आहेत.
खालापूर येथील माऊली कृपा चरिटेबल ट्रस्टच्या वतीने खालापूर ते आळंदी असा पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पालखीमध्ये सुमारे 200 वारकरी सहभागी झाले आहेत. हे वारकरी मुंबई-पुणे महामार्गाने पायी येत होते. पायी पालखी साते फाटा येथे आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आली होती. मुंबईहून पुण्याकडे येत असलेल्या एक टेम्पो स्त्याच्या कडेने जाणार्या वारकर्यांच्या समुहामध्ये घुसला. त्यात 30 वारकारी जखमी झाले. तर दोन वारकारी महिलांचा मृत्यु झाला.
या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, वडगाव मावळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी जखमी वारकर्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. कामशेत येथील महावीर हॉस्पिटलमध्ये 14 वारकर्यांवर उपचार करण्यात येत आहे. अपघातात जखमी झालेले वारकरी हे प्रामुख्याने 60 ते 70 वयोगटातील असून त्यातील 4 जणांची प्रकृती गंभीर आहे.


