maharashtra

एसटीची ढेबेवाडी, कोल्हापूर, पुणे मार्गावर धाव

संपाचा 39 वा दिवस : कराड आगाराचे सुमारे ३ कोटी १२ लाखांचे नुकसान

ST runs on Dhebewadi, Kolhapur, Pune route
एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आज गुरुवारी १६ रोजी 39 वा दिवस असून कराड आगाराचे आजअखेर सुमारे ३ कोटी १२ लाखांचे नुकसान आहे. बुधवारी १५ रोजी ढेबेवाडी, कोल्हापूर, पुणे मार्गावर कराड आगारातील बसेस धावल्या असून बसच्या दिवसात 24 फेऱ्या झाल्या असल्याची माहिती कराडचे प्रभारी आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी दिली.

कराड : येथील बस स्थानकाबाहेर सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आज गुरुवारी १६ रोजी 39 वा दिवस असून कराड आगाराचे आजअखेर सुमारे ३ कोटी १२ लाखांचे नुकसान आहे. बुधवारी १५ रोजी ढेबेवाडी, कोल्हापूर, पुणे मार्गावर कराड आगारातील बसेस धावल्या असून बसच्या दिवसात 24 फेऱ्या झाल्या असल्याची माहिती कराडचे प्रभारी आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी दिली.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात बेमुदत संप पुकारला आहे. कराड बस स्थानकाबाहेरही एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला असून गुरुवारी १६ रोजी येथील संपाला 39 दिवस पूर्ण झाले. या संपकाळात कराड आगारातील बससेवा ठप्प असल्याने आगाराचे आजअखेर सुमारे ३ कोटी १२ लाखांचे नुकसान आहे. तसेच आगारातील ९७ प्रशासकीय व कार्यशाळा कर्मचारी कामावर रुजू असून आत्तार्यंत ५५ जणांचे निलंबन, तर १८ जणांची सेवासामाप्ती करण्यात आली आहे.
पगारवाढ, शासन आणि राज्य परिवहन महामंडळाच्या आवाहनानुसार कराड आगारातील ११ कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. आगारात 5 चालक, 6 वाहन सेवेत रुजू झाले असून बुधवारी ढेबेवाडी, कोल्हापूर, पुणे मार्गावर कराड आगारातील बसच्या एका दिवसात 24 फेऱ्या झाल्या. प्रवास्यांची संख्या गृहीत धरून ढेबेवाडी, कोल्हापूर, पुणे मार्गावर बसेस सुरु करण्यात आल्या आहेत.
कराड आगारातील कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी बस स्थानकाबाहेर बेमुदत संप सुरु केला आहे. या संपाचा गुरुवारी १६ रोजी 39 दिवस पूर्ण झाले. दरम्यान, पगारवाढ, शासन आणि राज्य परिवहन महामंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कराड आगारातील ११ चालक-वाहक सेवेत रुजू झाले आहेत. तसेच प्रशासकीय 3, मॅकॅनिकल 1 कर्मचारी वगळता क्लेरीकलचे सर्व कर्मचारी सेवेत हजर आहेत. तर आत्तार्यंत ५५ जणांचे निलंबन, तर १८ जणांची सेवासामाप्ती करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांची सेवेत रुजू होण्याची मानसिकता
राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत पुकारलेला संप, पगारवाढ, राज्य परिवहन महामंडळ व सरकारने कारवाईचा दिलेला आदेश आणि यासंदर्भात 20 तारखेला न्यायालयाचा होणारा निर्णय या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची सेवेत रुजू होण्याची मानसिकता झाली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर सर्व कर्मचारी सेवेत रुजू होतील.
- विजय मोरे (प्रभारी कराड आगार व्यवस्थापक)