maharashtra

पुण्यात आढळलेली शिवकालीन नाणी साताऱ्यातील संग्रहालयात


Shivakalin coins found in Pune in a museum in Satara
पुणे जिल्ह्यातील विहम (ता. खेड) येथे आढळून आलेली १५ ते १८ व्या शतकातील तांब्याची १४७ नानी पुणे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने यांच्याकडून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे सुपुर्द करण्यात आली.

सातारा : पुणे जिल्ह्यातील विहम (ता. खेड) येथे आढळून आलेली १५ ते १८ व्या शतकातील तांब्याची १४७ नानी पुणे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने यांच्याकडून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे सुपुर्द करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, विहम येथील सुयश रोकडे हा मुलगा दि. ४ जानेवारी २०२२ रोजी रोहीदास सावंत यांच्या शेतात शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेला होता. यावेळी त्याला शेतात तांब्याची नाणी दिसून आली. याबाबतची माहिती मिळताच तहसीलदारांनी ती नाणी ताब्यात घेऊन संशोधनाकरीता पुणे पुरातत्व विभागाच्या ताब्यात दिली. संशोधनानंतर ही नानी १५ ते १८ व्या शतकातील असल्याचे समोर आले. गुरुवारी सकाळी पुणे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाणे यांनी सर्व नानी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महराज संग्रहालयाकडे सुपुर्द केली.
यामध्ये शिवराई नाणी, अकबर नाणी, बहामणी, सुलतान नाणी, निजाम शाही नाणी, ईस्ट इंडिया कंपनीची नाणी अशा एकूण २.४० किलो वजनाच्या १४७ नाण्यांचा समावेश आहे. या नाण्यांचे संग्रहालयाच्या नूतन इमारतीत संवर्धन केले जाणार असल्याचे संग्रहालयाचे अभीरक्षक प्रवीण शिंदे यांनी सांगितले.