स्फोटाच्या मोठ्या आवाजाने परिसर हादरला आजूबाजूच्या घरांना तडे
पुणे, दि. 3 फेब्रुवारी 24 पेंटॅगॉन प्रेस आणि लष्कराच्या दक्षिण कमांडच्या सहकार्याने पुण्यातील राजेंद्र सिंहजी आर्मी मेस अँड इन्स्टिटयूट येथे “कलम आणि कवच” या संरक्षणविषयक साहित्य महोत्सवाचे दि. 3 फेब्रुवारी 24 रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घ...
शाहूपुरी परिसरातील रेफ्रिजरेटर मधून कॉम्प्रेसर चोरी करणाऱ्या गुन्हेगाराचा छडा पोलिसांनी तीन दिवसात लावला आहे.
अज्ञात चोरट्याने फ्रिजच्या कॉम्प्रेसर ची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाचं सत्र सुरुच आहे. आजही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला आहे. तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली आहे.
रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती राज्यस्तरीय परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन बानुगडे - पाटील बोलत होते. व्यासपीठावर खासदार श्रीनिवास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, श्री गाडगेबाबा मिशन मुंबईचे चेअरमन मधुसूदन मोहिते पाटील, आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार माने पाटील, श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अरुण माने, विद्यार्थी विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष्या मनिषा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वसामान्यांचा विचार न करता प्रत्येक ठिकाणी आपल्याच घरातील लोकांनाच पद, उमेदवारी देऊन तालुक्यावर हुकूमशाही लादली जात असल्याचा टोला माढा लोकसभा खासदार रणजितदादा नाईक-निंबाळकर यांनी मिस्टर रामराजे यांना लगावला.
जेष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके आणि पांडुरंग तारळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते निवडण्यात आलेली खटाव तालुका मराठी पत्रकार परिषद संघाची कार्यकारिणी शनिवारी जाहीर करण्यात आली.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अलीकडे महाराष्ट्राला डिवचणारी वक्तव्ये केल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्यापेक्षा इथे बसून त्यांना तात्काळ त्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे होते.
गोव्यातील पणजी येथील मिरामार बीचवर पार पडलेल्या जागतिक स्तरावरील 'आयर्नमॅन ७०.३ गोवा' स्पर्धेत साताऱ्यातील डॉ. अजिंक्य दिवेकर, अश्विन दिवेकर या बंधूंनी छाप पाडली.
यादोगोपाळ पेठ येथे अत्यंत कमी दाबाने पाणी येत असून गोल मारुती मंदिर परिसरात पाण्याची प्रचंड टंचाई आहे. त्यामुळे वैतागलेल्या महिलांनी नगरपालिकेत धाव घेऊन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना निवेदन सादर केले.
मिरज-पुणे रेल्वे मार्गावर लोणंद रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या फलटण रेल्वे पुलाखाली रेल्वेच्या धडकेत तरडगाव येथील एका युवकाचा मृत्यु झाला.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जांब (ता. खटाव) ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील देशसेवा करीत असलेले जवान व सेवानिवृत्त झालेले जवान यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी माजी सैनिकांना पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात दाखल असलेल्या अॅट्रोसिटी प्रकरणाचे तपास अधिकारी सरकार बदलताच राजकीय दबावाने बदलण्यात आल्याचा आरोप या प्रकरणातील फिर्यादी महादेव पिराजी भिसे यांनी केला असून याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे न्याय मिळावा यासाठी दाद मागितली आहे.
सरकारच्या उदासिनतेमुळे मातंग, मोची, होलार, चांभार, ढोर व धनगर समाज विकासापासून दूर आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने कृतीशील आराखडा उभारावा, अशी मागणी माजी मंत्री व बहुजन विकास परिषद (महाराष्ट्र)चे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केली.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस सातारा स्थानिक गुन्हे शाखा, सातारा तालुका पोलीस, सातारा शहर पोलीसांनी तपास करुन तातडीने अटक केली. त्याबद्दल या तिन्ही पोलीस पथकास गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज त्यांच्या निवासस्थानी बोलावून त्यांचे विशेष कौतुक केले.
सन 2022-23 वर्षासाठी पाटण तालुका पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. यावेळी अध्यक्षपदी ह.भ.प. आनंदराव देसाई यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी शंकरराव मोहिते, उपाध्यक्षपदी संजय कांबळे व जयभीम कांबळे यांच्या सर्वानुमते बिनविरोध निवडी करण्यात आल्या.
हायपरटेन्शन म्हणजेच उच्चरक्तदाब हा फार गंभीर आजार मानला जातो. म्हणून त्याला द सायलेंट किलर म्हणून संबोधलं जातं. कारण उच्च रक्तदाबाची लक्षणं ही बराच काळ लक्षात येत नाहीत
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज मुंबईत निधन झाले. ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २८ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. लतादीदींच्या निधनाने संपूर्ण देशातून शोक व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला आहे.
दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचे आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ज्येष्ठ गायिका यांना या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला कोविड-19 साठी पॉझिटिव्ह चाचणी झाल्यानंतर आणि त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाल्याने त्यांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 28 जानेवारीच्या सुमारास तिला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आले, जेव्हा तिच्यामध्ये थोडीशी सुधारणा दिसून आली. मात्र, ५ फेब्रुवारीला लता मंगेशकर यांची प्रकृती बिघडली आणि त्या पुन्हा व्हेंटिलेटरवर होत्या.
गेल्या काही वर्षात फलटणमधील संघटीत गुन्हेगारीला चांगला चाप बसला होता. अपवादात्मक घटना वगळता फलटण शांत होते. मात्र, बुधवारी पुन्हा संघटीत गुन्हेगारीने डोके वर काढले असून यामध्ये ठोस कारवाई झाली नाही तर फलटणमध्ये डोक्याला ताप होणारच, खून होणारच अशी स्थिती निर्माण होवू पाहत आहे. त्यामुळे पोलिसांनी राजकीय दबाव झुगारुन खर्या अर्थाने कायद्याचे राज्य असल्याचे दाखवत गुन्हेगारी प्रवृत्तींना मोक्का लावण्याची गरज असल्याची आजच्या घडीला तमाम फलटणकरांमध्ये भावना आहे.
सातारा जिल्ह्यात गुरूवारी पत्रकार दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सातार्यात जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात विविध विधायक उपक्रमांनी पत्रकार दिन साजरा झाला. यामध्ये अनेक सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला.
छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे जावळी तालुका होय. या जावली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मेढा नगरीचे नगरसेवक जेष्ठ पत्रकार शशिकांत गुरव यांची निवड करण्यात आली. तर कुढाळचे कार्याध्यक्ष इम्तियाज मुजावर, उपाध्यक्ष कासचे सूर्यकांत पवार व आनेवाडीचे शहाजी गुजर, सचिव धनंजय गोरे यांची निवड करण्यात आली.
भुविकास बॅक चौकातील पानटपरीच्या आडोशाला जुगाराचा खेळ सुरू होता. यांची माहिती शाहूपुरी पोलीसांना मिळताच पोलीसांनी छापा टाकला. यावेळी संशयित गणपत दगडू कुंभार (वय 69 रा. मेढा), शहाजी उत्तम कदम (वय 39 रा. किन्हई), सुभाष गुलाब बनसोडे (वय 68 रा. डबेवाडी), राकेश केशव माने (वय 34 रा. डबेवाडी), पूंडलिक मल्लाप्पा मंगसुळे यांना ताब्यात घेतले.
अफगाणिस्तानातील शिया मशिदीवर ‘आयएस’ने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. या हल्ल्याबाबत भारतानेही सुरक्षा परिषदेपुढे चिंता व्यक्त केली आहे. १५ सदस्य देशांच्या सुरक्षा परिषदेने एक निवेदन काढून या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी खासदार, आमदारांना आडवा, त्यासंदर्भात त्यांना जाब विचारा, त्यांच्याकडे बोलण्यासारखे आता काही राहिले नाही. त्यांना मतदार संघात फिरू देऊ नका. अशा शब्दात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज आरक्षणप्रश्नी प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘गेल्या तीस वर्षांच्या कालावधीत मोठमोठी पदे मिळूनही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना फलटण तालुक्यात कोणतेही भरीव विकासकाम करता आलेले नाही, विकासकामाचा त्यांनी नुसता दिखावा केला असून, आपल्या हक्काचे पाणी बारामतीकरांना विकून त्याबदल्यात पदे भोगण्यात त्यांनी धन्यता मानली आहे. त्यांच्या वयाचे भान राखून मी गप्प आहे अन्यथा त्यांची जागा आतमध्ये असती,’ असा घणाघाती आरोप खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.