maharashtra

कॉम्प्रेसर चोरीचा गुन्हा तीन दिवसात उघड

शाहूपुरी पोलिसांची कामगिरी

शाहूपुरी परिसरातील रेफ्रिजरेटर मधून कॉम्प्रेसर चोरी करणाऱ्या गुन्हेगाराचा छडा पोलिसांनी तीन दिवसात लावला आहे.

सातारा : शाहूपुरी परिसरातील रेफ्रिजरेटर मधून कॉम्प्रेसर चोरी करणाऱ्या गुन्हेगाराचा छडा पोलिसांनी तीन दिवसात लावला आहे.
शाहूपुरी पोलिसांनी महादेव शंकर वायदंडे वय 35 राहणार सम्राट हॉटेलच्या शेजारी कोडोली तालुका सातारा याला निवासस्थान परिसरातून ताब्यात घेतले आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 14 ऑक्टोबर रोजी कॉम्प्रेसर चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी निर्देश दिल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. दिनांक 17 ऑक्टोबर रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत कॉम्प्रेसर चोरीतील गुन्हेगार कोडोली परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. ही चोरी त्याने शाहूपुरी परिसरात केल्याचेही समोर आले होते. संबंधित पथकाने या संशयितास ताब्यात घेऊन रेफ्रिजरेटर मधील कॉम्प्रेसर चोरी बाबत विचारणा केली असता त्याने ही चोरी केल्याचे कबूल केले. हे कॉम्प्रेसर 40 हजार रुपये किमतीचे असून ते जप्त करण्यात आले आहेत.
या कारवाईमध्ये धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार सुरेश घोडके, मनोज  मदने, निलेश काटकर, ज्योतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, सुमित मोरे, सुनील भोसले यांनी सहभाग घेतला होता.