maharashtra

दिवेकर बंधूंची 'आयर्नमॅन'वर छाप

साताऱ्यातील डॉ. अजिंक्य, अश्विनचे स्पर्धेत यश

गोव्यातील पणजी येथील मिरामार बीचवर पार पडलेल्या जागतिक स्तरावरील 'आयर्नमॅन ७०.३ गोवा' स्पर्धेत साताऱ्यातील डॉ. अजिंक्य दिवेकर, अश्विन दिवेकर या बंधूंनी छाप पाडली.

सातारा : गोव्यातील पणजी येथील मिरामार बीचवर पार पडलेल्या जागतिक स्तरावरील 'आयर्नमॅन ७०.३ गोवा' स्पर्धेत साताऱ्यातील डॉ. अजिंक्य दिवेकर, अश्विन दिवेकर या बंधूंनी छाप पाडली.
गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या विश्वविख्यात आयर्नमॅन स्पर्धेत जगभरातून १,४४५० स्पर्धक सहभागी झाले होते. यात २ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर धावणे याचा समावेश होता.
डॉ. अजिंक्य दिवेकर हे फिजिशियन असून, त्यांच्या व्यस्त दैनंदिनीमधूनही ते या साहसी खेळाच्या आवडसाठी वेळ काढत असतात. कधी दुपारी ३ वाजताही भर उन्हातसुध्दा धावतात, सायकल चालतात. डॉ. अजिंक्य यांनी ही स्पर्धा ७ तास २७ मिनिटांत पूर्ण केली. त्यांचे बंधू अश्विन यांनी ८ तासांत पूर्ण केली.
डॉ. दिवेकर यांनी सांगितले की, आयर्नमॅन स्पर्धा आजवर परदेशातच पार पडत आहेत. त्याची नियमावली खूप कठिण असल्याने ही स्पर्धा घेण्याची परवानगी काहीच देशांना मिळाली आहे. त्यामध्ये भारतात ही स्पर्धा यापूर्वी २०१९ साली होती. त्यानंतर दि. १३ नोव्हेंबर २०२२ ला झाली. यात पोहणे, सायकलिंग, धावणे याचा समावेश होता. २ किलोमीटर पोहण्यासाठी १ तास १० मिनिटे, सायकलिंगसाठी ५ तास ३० मिनिटे व धावण्यासाठी ३ तास ३० मिनिटे असा एकूण ९ तासांच्या आत वेळेत पूर्ण करावी लागते.
त्यांना वडील डॉ. कमलाकर दिवेकर, आई अनुराधा दिवेकर, आयर्नमॅन डॉ. सुधीर पवार व कुटुंबीयांचे सहकार्य मिळाले. दोघा बंधूंचा पूर्ण आयर्नमॅन स्पर्धा पार पाडण्याचा मानस आहे.