अज्ञात चोरट्याने फ्रिजच्या कॉम्प्रेसर ची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : अज्ञात चोरट्याने फ्रिजच्या कॉम्प्रेसर ची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 ते 11 ऑक्टोबर दरम्यान कोटेश्वर मंदिराशेजारी असलेल्या एका फ्रिज दुरुस्तीच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने 40 हजार रुपये किंमतीचे फ्रिजचे 14 कॉम्प्रेसर चोरून नेले आहेत. अधिक तपास महिला पोलीस हवालदार गाढवे करीत आहेत.