maharashtra

जुगार अड्डयावर छापे


Impressions are gained in a fluid, global, diffused way
भुविकास बॅक चौकातील पानटपरीच्या आडोशाला जुगाराचा खेळ सुरू होता. यांची माहिती शाहूपुरी पोलीसांना मिळताच पोलीसांनी छापा टाकला. यावेळी संशयित गणपत दगडू कुंभार (वय 69 रा. मेढा), शहाजी उत्तम कदम (वय 39 रा. किन्हई), सुभाष गुलाब बनसोडे (वय 68 रा. डबेवाडी), राकेश केशव माने (वय 34 रा. डबेवाडी), पूंडलिक मल्लाप्पा मंगसुळे यांना ताब्यात घेतले.

सातारा : एसटी स्टॅड व परिसरातील दोन जुगार अड्डयावर शाहूपुरी पोलीसांनी छापे टाकत कारवाई केली.
भुविकास बॅक चौकातील पानटपरीच्या आडोशाला जुगाराचा खेळ सुरू होता. यांची माहिती शाहूपुरी पोलीसांना मिळताच पोलीसांनी छापा टाकला. यावेळी संशयित गणपत दगडू कुंभार (वय 69 रा. मेढा), शहाजी उत्तम कदम (वय 39 रा. किन्हई), सुभाष गुलाब बनसोडे (वय 68 रा. डबेवाडी), राकेश केशव माने (वय 34 रा. डबेवाडी), पूंडलिक मल्लाप्पा मंगसुळे यांना ताब्यात घेतले. याच्याकडून 2 हजार 687 रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. अधिक तपास पोलीस स्टेशनचे अंमलदार करत आहेत.  
दुसऱ्या घटनेत एसटी स्टॅड येथील सम्राट वडापाव शेजारील पानटपरी जवळ जुगाराचा खेळ सुरू होता. यांची माहिती शाहूपुरी पोलीसांना मिळताच पोलीसांनी छापा टाकुन संशयित अर्जुन शिवलाल राठोड (वय 49 रा. लक्ष्मीटेकडी), मोहम्मद लतिफ सय्यद (वय 35 रा. शनिवार पेठ) यांना ताब्यात घेतले. याच्याकडून 710 रूपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. अधिक तपास पोलीस स्टेशनचे अंमलदार करत आहेत.