जावली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शशिकांत गुरव यांची निवड
उपाध्यक्ष सूर्यकांत पवार व शहाजी गुजर
छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे जावळी तालुका होय. या जावली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मेढा नगरीचे नगरसेवक जेष्ठ पत्रकार शशिकांत गुरव यांची निवड करण्यात आली. तर कुढाळचे कार्याध्यक्ष इम्तियाज मुजावर, उपाध्यक्ष कासचे सूर्यकांत पवार व आनेवाडीचे शहाजी गुजर, सचिव धनंजय गोरे यांची निवड करण्यात आली.
सातारा : छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे जावळी तालुका होय. या जावली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मेढा नगरीचे नगरसेवक जेष्ठ पत्रकार शशिकांत गुरव यांची निवड करण्यात आली. तर कुढाळचे कार्याध्यक्ष इम्तियाज मुजावर, उपाध्यक्ष कासचे सूर्यकांत पवार व आनेवाडीचे शहाजी गुजर, सचिव धनंजय गोरे यांची निवड करण्यात आली.
जावली पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा जावळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढा येथे संपन्न झाली. यामध्ये पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तसेच या बैठकीत जावळी तालुका पत्रकार संघाच्या कामकाजाविषयी चर्चा करण्यात आली, यामध्ये सहसचिवपदी नारायण जाधव, खजिनदारपदी महेश बारटक्के, अंतर्गत हिशोब तपासणीस सोमनाथ साखरे व अभिजीत शिंगटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जेष्ट पत्रकार नारायण शिंगटे व सुरेश पार्टे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष शशिकांत गुरव म्हणाले, सर्व पत्रकार बांधवांनी माझ्यावर विश्वास दाखवून, मला बहूमताने विजयी केले आहे. त्या विश्वासाला पात्र राहून व सर्वाना विचारात घेऊन, मला मिळालेल्या संधीचे सोने करणार आहे. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला विजय सपकाळ, संजय दळवी, रघुनाथ पार्टे, संदीप गाढवे, प्रशांत गुजर, नंदू गाडगीळ, भास्कर धनावडे, निलेश शिंदे, सुहास भोसले पाटील, वसिम शेख, दत्तात्रय पवार आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्याध्यक्ष इम्तियाज मुजावर यांनी आभार मानले
नूतन कार्यकारिणीचे सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, शरद काटकर, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार अजित जगताप, धनराज जगताप, जितेंद्र जगताप, नारायण शिंगटे, सुरेश पार्टे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले. दरम्यान, अध्यक्ष पदाची धुरा ही जावळी तालुक्यातील ग्रामीण भागात देण्यासाठी यापुढे प्रयत्न होणे गरजेचे आहे. फक्त मोठ्या गावातच अध्यक्ष पद वाटप झाल्यास निदान पत्रकारिता क्षेत्रात लोकशाही राहणार नाही. जिल्हा व तालुका प्रतिनिधी म्हणजेच सक्षम पत्रकार, असा गैरसमज होत आहे. त्याला त्यामुळे बळकटी मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तसेच मान्यवरांचे अभिनंदन सुध्दा केले जात आहे.


