maharashtra

जांब येथे सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत अमृत महोत्सव साजरा


भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जांब (ता. खटाव) ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील देशसेवा करीत असलेले जवान व सेवानिवृत्त झालेले जवान यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी माजी सैनिकांना पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

पुसेगाव : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जांब (ता. खटाव) ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील देशसेवा करीत असलेले जवान व सेवानिवृत्त झालेले जवान यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी माजी सैनिकांना पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मंचावर सरपंच अमित मदने, उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, ग्रामविकास अधिकारी बोराटे, कॅप्टन पतंगराव चव्हाण, सुभेदार आनंदराव चव्हाण, सुभेदार पंढरीनाथ चव्हाण, रामचंद्र शिंदे, भगवान चव्हाण, पांडुरंग देशमुख, शंकर जाधव, उदयसिंह शिंदे, रामचंद्र देशपांडे, जगन्नाथ देशपांडे, पांडुरंग दळवी, युवराज शिंदे, धनाजी सुर्यवंशी, शहाजी सुर्यवंशी, साहेबराव बिटले, दिलीप शिंदे, सुदाम निंबाळकर, हणमंत पवार, तुकाराम चव्हाण तसेच वीरपत्नी जनाबाई सुर्यवंशी, सुनंदा कदम, कलावती चव्हाण, सखुबाई पवार, सुमन चव्हाण, प्रभावती शेटे, मालन सुर्यवंशी, बबई बिटले, लता शिंदे उपस्थित होते. यावेळी देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले कॅप्टन पतंगराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रामसेवक झानेश्वर बोराटे यांनी, तर सुत्रसंचालन वायदंडे यांनी केले व आभार सरपंच अमित मदने यांनी मानले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ग्रामपंचायतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये ग्रामपंचायतीच्यावतीने घरोघरी तिरंगा ध्वजाचे वितरण, ग्रामसभा, अंगणवाड्यामधील बाळगोपाळांना खाऊ वाटप, आजी-माजी सैनिकांचा सन्मान सोहळा, प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.