पुसेगाव, ता खटाव येथे मरीआई मंदिराजवळ काल रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी दोन लाख पंचान्नव हजार नऊशे रुपयांची जबरी चोरी करून संजय तोडकर यांना लोखंडी सळई, लाडकी दांडके, सुरा यांनी मारहाण करून पोबारा केला.
पुसेगाव : पुसेगाव बाजारपेठेतून जाणाऱ्या सातारा-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम पोलीस स्टेशन ते येरळा नदीपर्यंत अनेक दिवसांपासून रखडले आहे. सदरचा रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सतत निर्माण होत असतो. पुसेगाव मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा प्रशासकीय यंत्रणा व संबंधित ठेकेदारच्या विरोधात दि. १० फेब्रुवारी रोजी पुसेगाव येथील छ. शि...
पुसेगाव, ता. खटाव ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी संपूर्ण गावामध्ये "निर्जंतुकीकरण मोहीम" राबविण्यात आली. श्री सेवागिरी महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात मशीनच्या साहाय्याने औषध फवारणी करून हे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
बैलगाडी शर्यत शौकीन व शेतकर्यांनी पुसेगावमधील चौका-चौकात हालगीच्या कडकडाटात, गुलालाची उधळण करीत व फटाक्यांच्या धुमधडाक्यात जल्लोष साजरा केला. ठिकठिकाणी साखर-पेढे वाटून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले.
निढळ, ता. खटाव येथील रुग्णाला त्रास जाणवू लागल्याने शेजारील रहिवाश्याने त्यांच्या कडील चारचाकीतून त्या व्यक्तिला पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी दुपारी एक च्या सुमारास आणले. रुग्ण दवाखान्यात गेल्यावर गाडी वळवताना इंजिनजवळील बॅटरीजवळ शॉर्टसर्किट होऊन गॅस किट असलेल्या गाडीने पेट घेतला. या आगीत चारचाकी जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.
पुसेगाव, ता. खटाव येथे विकास जाधव व गौरव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या श्वान शर्यतीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. बैलगाडी शर्यती बंद असल्याने या शर्यती पाहण्यासाठी शौकिनांनी तोबा गर्दी केली होती.
पुसेगावसह परिसरात दररोज विजेच्या कडकडाटासह धो -धो पाऊस कोसळत असून, आठवडाभरात येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. सतत पडणार्या या मुसळधार पावसाने जमीन वाफशावर येत नसल्याने खरिपातील सोयाबीन, घेवडा ही पिके पिवळी पडत आहेत. त्यामुळे बळीराजाच्या हाताशी आलेला खरीप हंगाम धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या दहा दिवसांपासून भक्तांकडून पाहूणचार घेत असलेल्या घरगुती गणपती बाप्पांचा, मंगळवारी (दि. 1) ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ असा निरोप देत जड अंत:करणाने पुसेगाव सुवर्णनगरीत विसर्जन झाले. दरम्यान, सकाळपासूनच घरगुती गणपतीचे पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या सणाला विसर्जनासाठी यंदा पाणवठ्यांवर एकत्र येण्याऐवजी भागाभागांतच मूर्ती विसर्जन करण्यास नागरिकांनी पसंती दिली.
पुसेगाव, ता. खटाव येथील भाजपच्यावतीने भाविकांसाठी मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि. 29) आंदोलन करण्यात आले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून सर्व मंदिरे बंद आहेत. आता जवळजवळ सर्वच व्यवहार सुरू झाल्याने मंदिरेही भाविकांसाठी खुली करावी, या मागणीसाठी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराज देवस्थान तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे हे आंदोलन करण्यात आले.
पुसेगावसह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू असल्याने खरीप हंगामातील पिके पिवळी पडू लागली असून, पिकांची वाढ देखील खुंटली आहे. तसेच पिकांवर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पेरणीस केलेला खर्च वसूल होणार की नाही, याबाबत शेतकरी चिंतेत सापडला आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने संपूर्ण सातारा जिल्ह्यात दक्षता घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषदेच्यावतीने पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ‘अर्सेनिक अल्बम-30’ या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला भाग प्रशासनाकडून सील करून तो ‘कंटेन्मेंट झोन’ (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून जाहीर करण्यात येतो. मात्र, या ‘कंटेन्मेंट झोन’चे गांभीर्यच नागरिकांच्या लक्षात येत नसून पुसेगाव (ता. खटाव) येथील कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या भागात लावण्यात आलेले कळक, बॅरिकेटस् बाजूला सारून नागरिकांची ये-जा सर्रास सुरू असल्याचे चित्र गावात बहुतांशी ठिकाणी दिसून येत आहे.